देशाप्रति कृतज्ञता बाळगा
By Admin | Updated: October 1, 2014 00:50 IST2014-10-01T00:50:09+5:302014-10-01T00:50:09+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विकासात रावबहादूर डी.लक्ष्मीनारायण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विद्यार्थ्यांना नवे मार्ग सापडले. त्यांच्यासारख्या व्यक्तींची संख्या

देशाप्रति कृतज्ञता बाळगा
मुकुंद घारपुरे : रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांच्या स्मृतींना अभिवादन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विकासात रावबहादूर डी.लक्ष्मीनारायण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विद्यार्थ्यांना नवे मार्ग सापडले. त्यांच्यासारख्या व्यक्तींची संख्या कमी होत चालली आहे. आज माणसे मोठी होत आहेत आणि मनं लहान.
व्यक्ती कितीही मोठी झाली तरी देशाच्या प्रति कृतज्ञता बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध उद्योजक डॉ.मुकुंद घारपुरे यांनी व्यक्त केले. ‘एलआयटी’च्या (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) वतीने रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांच्या ८४ व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. गुरुनानक भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. घारपुरे बोलत होते.
नागपूर विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमासे, लक्ष्मीनारायण संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. महेशकुमार येंकी उपस्थित होते.
समाजाला आज अनेक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात अभियंत्यांची भूमिका मोठी आहे. विद्यार्थ्यांनी यात आणखी पुढाकार घेण्याची गरज असल्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. डॉ. महेशकुमार येंकी यांनी प्रास्ताविकातून एलआयटीच्या विकासकार्यावर प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)