बाधितांचा ग्राफ वाढतीवरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:09 IST2021-03-20T04:09:04+5:302021-03-20T04:09:04+5:30
सावनेर/हिंगणा/काटोल/नरखेड/कळमेश्वर/कुही/रामटेक/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी तेरा तालुक्यात ७०८ रुग्णांची नोंद झाली. ...

बाधितांचा ग्राफ वाढतीवरच!
सावनेर/हिंगणा/काटोल/नरखेड/कळमेश्वर/कुही/रामटेक/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी तेरा तालुक्यात ७०८ रुग्णांची नोंद झाली. तीत २३२ रुग्ण एकट्या सावनेर तालुक्यातील आहेत. तालुक्यात ५ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
सावनेर तालुक्यातील ६ केंद्रावर ९९४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तीत सावनेर येथील केंद्रावर ७३, चिंचोली (६१), पाटणसावंगी (६४), केळवद (१५), खापा (१०) तर बडेगाव येथे ९ रुग्णांची नोंद झाली. पाटणसावंगी येथे ३, चिंचोली आणि खापा येथे प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. तालुक्यात आतापर्यंत १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हिंगणा तालुक्यात १०६५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ९१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी (३३), हिंगणा (१५), डिगडोह (९), इसासनी व टाकळघाट येथे प्रत्येकी ५, नीलडोह, मोंढा, अडेगाव व रायपूर येथे प्रत्येकी ३, नागलवाडी, भारकस येथे प्रत्येकी दोन तर सालईदाभा, कान्होलीबारा, पोही, डेगमा पिंजारी, गुमगाव, किन्ही, देवळी व वागदरा येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ४९५२ रुग्णांची नोंद झाली. यातील ४०५६ रुग्ण बरे झाले आहेत तर १०९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
कळमेश्वर तालुक्यात संक्रमण साखळी अधिक घट्ट झाली आहे. तालुक्यात आणखी ६४ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ३४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात धापेवाडा येथे (९), सुसंद्री (६), उपरवाही (३), खैरी (२) तर वरोडा, सिंधी, भडांगी, सावंगी तोमर, उबाळी, वाढोणा, घोराड, म्हसेपठार, मोहपा, तेलकामठी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ६६ रुग्णांची नोंद झाली. तीत शहरातील ३४ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. शहरात आय.यू.डी.पी येथे (६), जानकीनगर, बोरकर ले-आऊट, पंचवटी, शनि चौक, फिसके ले-आऊट येथे प्रत्येकी तीन, गळपुरा, काळे ले-आऊट, खंते ले-आऊट येथे प्रत्येकी दोन रुग्ण तर खोजा ले-आऊट, थोमा ले-आऊट, हत्तीखाना, होळीमैदान, तार, सरस्वतीनगर, पाॅवरहाऊस येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये कोंढाळी, खामली येथे प्रत्येकी चार रुग्ण, वंडली (वाघ) येथे तीन , मरकसूर, मसली, येनवा, डोरली, गोंडीदिग्रस येथे प्रत्येकी दोन तर खानगाव, लाडगाव, पानवाडी, झिल्पा, सोनोली, मेंडकी, हरणखुरी, कलंबा, राहुळगाव, कचारी सावंगा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात २१ रुग्णांची नोंद झाली. शहरात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. ग्रामीण भागात ग्रामीण भागातील जलालखेडा केंद्रावर (१३), मोवाड (४) तर सावरगाव येथे तीन रुग्णांची नोंद झाली. सध्या ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २७१ तर शहरातील ४६ इतकी झाली आहे.
पारशिवनी तालुक्यातील कन्हान येथे १५ रुग्णांची नोंद झाली. कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत १,१६५ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ९६८ रुग्ण बरे झाले आहे तर ३१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी यांनी दिली. कुही तालुक्यात कुही, मांढळ, वेलतूर, साळवा व तितूर प्राथमिक केंद्रात १८४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.