नातवाने केली आजीची हत्या

By Admin | Updated: December 26, 2016 02:29 IST2016-12-26T02:29:28+5:302016-12-26T02:29:28+5:30

क्षुल्लक कारणावरून डोक्यावर कुऱ्हाड मारून दारुड्या तरुणाने वृद्ध आजीची हत्या केली.

Granddaughter killed grandmother | नातवाने केली आजीची हत्या

नातवाने केली आजीची हत्या

नागपूर : क्षुल्लक कारणावरून डोक्यावर कुऱ्हाड मारून दारुड्या तरुणाने वृद्ध आजीची हत्या केली. रविवारी दुपारी १ वाजता पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या हद्दीतील पिपळा गावात ही घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपीचे नाव नितेश मनोहर शेंडे (वय २४) आहे. त्याच्या आईची आई लीलाबाई बिसनराव वाढई (वय ७०) रोज दारात बसायची.मात्र, तिचे दारात बसणे आरोपी नितेशला अजिबात पसंत नव्हते.
त्यावरून तो नेहमी आजीसोबत वाद घालायचा. आईलाही शिवीगाळ करायचा. नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी जेवण झाल्यानंतर १ वाजता लीलाबाई दारात बसली. तेवढ्यात नितेश तेथे आला. त्याने आजीला दारात बसल्याचे पाहून तिच्याशी वाद सुरू केला. तिला शिवीगाळ करीत आरोपीने वृद्ध लीलाबार्इंच्या डोक्यावर कुऱ्हाडीने मारून तिला गंभीर जखमी केले. नितेशची आई नलूबाई मनोहर शेंडे (वय ५०) मदतीला धावली. तिने आरडाओरड करून आरोपी नितेशला शेजाऱ्यांच्या मदतीने कसेबसे आवरले. जखमी लीलाबार्इंना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. आरोपी नितेशविरुद्ध त्याची आई नलूबार्इंनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी सुरू असतानाच सायंकाळी ६ वाजता लीलाबाईला डॉक्टरांनी मृत घोषित केले.(प्रतिनिधी)
 

Web Title: Granddaughter killed grandmother