शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 20:58 IST

ग्रामीण भागातील डाकसेवकांनी गेल्या १२ दिवसापासून सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उग्र स्वरूप येत आहे. रामटेक येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान प्रकृतीची पर्वा न करता सलाईन लावून सहभागी झालेले मनसरचे शाखा डाकपाल हरिशंकर ढोक यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. रखरखत्या उन्हातही देशभरात सुरू असलेल्या संपादरम्यान आतापर्यंत पाच डाक कर्मचाऱ्यांचे बळी गेले असून, यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. केंद्र शासन व डाक विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण डाक कर्मचारी ‘करो या मरो’ या जिद्दीला पेटलेले असून, हे आंदोलन आणखी भडकण्याचे चिन्हे दिसून येत आहेत.

ठळक मुद्देमनसरचे डाकपाल ढोक यांचा मृत्यू : १२ दिवसात ५ कर्मचाऱ्यांचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रामीण भागातील डाकसेवकांनी गेल्या १२ दिवसापासून सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उग्र स्वरूप येत आहे. रामटेक येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान प्रकृतीची पर्वा न करता सलाईन लावून सहभागी झालेले मनसरचे शाखा डाकपाल हरिशंकर ढोक यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. रखरखत्या उन्हातही देशभरात सुरू असलेल्या संपादरम्यान आतापर्यंत पाच डाक कर्मचाऱ्यांचे बळी गेले असून, यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. केंद्र शासन व डाक विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण डाक कर्मचारी ‘करो या मरो’ या जिद्दीला पेटलेले असून, हे आंदोलन आणखी भडकण्याचे चिन्हे दिसून येत आहेत.ग्रामीण डाकसेवक समस्या निवारण मंचअंतर्गत विविध मागण्यांसाठी देशभरात संप सुरू असून, यामध्ये २.५० लाखांच्यावर कर्मचारी सहभागी आहेत. गेल्या १२ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. नागपूर विभागातील रामटेक रिजनमधील कर्मचाऱ्यांचेही आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी हरिशंकर ढोक यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना सलाईन लावण्यात आली होती. मात्र सलाईन लावूनही ते आंदोलनात सहभागी झाले. यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावली व नागपूरला आणताना त्यांचा मृत्यू झाला. हरिशंकर ढोक हे या आंदोलनातील पाचवे बळी ठरले आहेत. यापूर्वी काटोल भागातील आंदोलनात सहभागी नत्थूजी शिरपूरकर यांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता. याशिवाय १ जूनला सोलापूर डाक विभागातील डाकपाल डी.एल. बीरादार यांचा मोर्चादरम्यान चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला तर सांगली येथील लक्ष्मण सुहासे या कर्मचाऱ्याचाही असाच मृत्यू झाला. कर्नाटकातील टाऊनबाजार उपडाकघर येथील जीडीएस पॅकर नागेंद्र प्रसाद यांचा आंदोलनात मृत्यू झाला. आंदोलनातील काही कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. संघटनेचे सल्लागार सदस्य अ‍ॅड. डी.बी. वलथरे यांनी सांगितले की, आंदोलनात सहभागी कर्मचारी आता जिद्दीला पेटले असून शासनाने मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर हे आंदोलन आणखी पेटेल, अशा इशारा त्यांनी दिला.ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्थापन झालेल्या कमलेशचंद्र आयोगाच्या शिफारशी लागू करून कर्मचाऱ्यांचे वेतन व सुट्यासंबंधी धोरण ठरविण्यात यावे, ग्रामीण डाकसेवकांना डाक विभागात कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये नागपूर विभागातील ४,५०० कर्मचाऱ्यांसह राज्यातील ७० ते ८० हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Employeeकर्मचारीStrikeसंप