बाजार समितीच्या आवारातील धान्याची पाेती भिजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:08 IST2021-03-24T04:08:55+5:302021-03-24T04:08:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : तालुक्यात काेसळलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतातील काही पिकांसाेबतच शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात विकायला नेलेल्या ...

बाजार समितीच्या आवारातील धान्याची पाेती भिजली
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : तालुक्यात काेसळलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतातील काही पिकांसाेबतच शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात विकायला नेलेल्या धान्यालाही बसला. बाजार समिमतीच्या आवारात धान्याची पाेती झाकायची प्रभावी सुविधा नसल्याने धान्य भिजले आणि शेतकऱ्यांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले.
तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी साेमवारी (दि. २२) धान, तूर व हरभरा माैदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विकायला आणले हाेते. या धान्याची पाेती बाजार समितीच्या आवारात रचून ठेवण्यात आली हाेती. दरम्यान, साेमवारी मध्यरात्री वादळासह अवकाळी पावासाला सुरुवात झाली. त्यावेळी आवारात फारसे कुणी नसल्याने तसेच धान्याची पाेती झाकण्यासाठी वेळीच ताडपत्री न मिळाल्याने ती पाेती भिजली.
काही शेतकऱ्यांनी ताडपत्री मिळताच धान्याची पाेती झाकली. मात्र, खाली माेठ्या प्रमाणात पाणी वाहत हाेते. शिवाय बाजार समितीच्या आवाराला काही काळ तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने धान्याची पाेती खालून माेठ्या प्रमाणात भिजल्याने नुकसान झाले. दाेन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण असून, अवकाळी पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू असते, शिवाय पावसाच्या सरीही काेसळतात. या पावसामुळे काही शेतातील कापणीयाेग्य गहू, हरभरा तसेच मिरचीच्या पिकाचे माेठे नुकसान झाले आहे.
...
राईस मिलच्या आवारातही नुकसान
तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान भरडईसाठी (मिलिंग) राईस मिलमध्ये नेले आहे. तिथे भरडईला वेळ असल्याने त्यांनी धानाची पाेती राईस मिलच्या आवारात रचून ठेवली हाेती. ती पाेतीही या पावसामुळे भिजली आहेत. या पाेत्यांमधील धान्य भिजल्याने ते खराब हाेण्याची व धान्याची प्रत खालावण्याची शक्यता बळावली आहे. या प्रत खालावलेल्या धान्याला बाजारात चांगला भाव मिळणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.