पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:33+5:302020-12-02T04:11:33+5:30
पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान, प्रशासन सज्ज नागपूर/अमरावती : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघ आणि विधान परिषदेच्या शिक्षक ...

पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी
पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी
उद्या मतदान, प्रशासन सज्ज
नागपूर/अमरावती : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघ आणि विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोविड संसर्ग काळातील ही निवडणूक असल्यामुळे मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. नागपूर विभागात एकूण २ लाख ६ हजार ४५४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी ३२२ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. अमरावती विभागातील ७७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत प्रथमच २७ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी पाच जिल्ह्यातील ३५,६२२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.