ग्रा.पं. भवनाचे बांधकाम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST2021-02-16T04:10:30+5:302021-02-16T04:10:30+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पाटणसावंगी : सावनेर तालुक्यातील इसापूर येथे जनसुविधा याेजनेंतर्गत ग्रामपंचायत भवनासाठी शासनाने २० लाखाचा निधी मंजूर केला. ...

G.P. Start construction of the building | ग्रा.पं. भवनाचे बांधकाम सुरू करा

ग्रा.पं. भवनाचे बांधकाम सुरू करा

लाेकमत न्यूज नेटवर्क

पाटणसावंगी : सावनेर तालुक्यातील इसापूर येथे जनसुविधा याेजनेंतर्गत ग्रामपंचायत भवनासाठी शासनाने २० लाखाचा निधी मंजूर केला. याला दीड वर्षाचा कालावधी उलटूनही बांधकामाला सुरुवात झाली नाही. या ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य सम्राट गजभिये यांनी बेमुदत उपाेषण सुरू केले आहे.

सुमारे १,९३० लाेकसंख्या असलेल्या इसापूर येथील वाॅर्ड क्र. ३ मध्ये सन १९८९ मध्ये ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम करण्यात आले. या नवनिर्मित ग्रा.पं. इमारतीत प्रशासकीय कामकाज सुरू करण्यास वाॅर्ड क्र. १ व २ मधील नागरिकांनी विराेध केला. तेव्हापासून ग्रामपंचायत इमारत रिकामी पडून राहिली. सद्यस्थितीत ही जुनी इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. यामुळे ग्रामपंचायतचे कामकाज वाॅर्ड क्र. १ मधील मनाेरंजन केंद्राच्या इमारतीमधून चालविले जात आहे.

ग्रामपंचायत इमारतीची निकड लक्षात घेता नवीन ग्रा.पं. भवनाला मंजुरी देत शासनाने २० लाख रुपयाचा निधी वितरित केला. परंतु मंजूर आदेशानंतरही बांधकाम केले गेले नाही. परिणामी, शासनाचा निधी पडून राहिला. दरम्यान, १८ डिसेंबर २०२० राेजी ग्रामपंचायतने ठराव पारित करून निधी परत करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतच्या या निर्णयास विराेध दर्शवीत ग्रा.पं. सदस्य सम्राट गजभिये यांनी सदर ठराव रद्द करून वाॅर्ड क्र. २ मध्ये ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम सुरू करण्यात यावे, अशी मागणी करीत बेमुदत आमरण उपाेषण सुरू केले आहे. या आंदाेलनात जयंत सोमकुवर, पवन गोंडुळे, भारत पगारे, अविरत गजभिये, विलास गजभिये, रामू ढेपे, अनसूया पगारे, धनवंता रंगारी, बेबी भाेतमांगे आदींसह गावकऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: G.P. Start construction of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.