मृतकाच्या कुटुंबीयांना ग्रा.पं. देणार आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:09 IST2021-02-27T04:09:40+5:302021-02-27T04:09:40+5:30

कोराडी : कुटुंबातील सदस्यांचे निधन प्रत्येकासाठी दु:खदायकच. मृत व्यक्तीची भरपाई कुठल्याही परिस्थितीत होऊ शकत नसली, तरी मृतकाच्या कुटुंबीयांना अशा ...

G.P. to the family of the deceased. Will provide financial support | मृतकाच्या कुटुंबीयांना ग्रा.पं. देणार आर्थिक आधार

मृतकाच्या कुटुंबीयांना ग्रा.पं. देणार आर्थिक आधार

कोराडी : कुटुंबातील सदस्यांचे निधन प्रत्येकासाठी दु:खदायकच. मृत व्यक्तीची भरपाई कुठल्याही परिस्थितीत होऊ शकत नसली, तरी मृतकाच्या कुटुंबीयांना अशा वेळेला थोडा-फार का होईना, आर्थिक आधार देणे ही एक सहानुभूतीच समजली जाते. कोराडी नजीकच्या लोणखैरी ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक मृतकाच्या कुटुंबीयांना तत्काळ तीन हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या या महिन्यात झालेल्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरपंच लिलाधर भोयर, उपसरपंच बोधिसत्व झोडापे यांनी दिली. या निर्णयाची तत्काळ प्रभावाने अंमलबजावणीही करण्याचे ठरले. दुर्दैवाने शुक्रवारी लोणखैरी येथे यशवंतराव जवंजाळ यांचा मृत्यू झाला. यांच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायतच्या वतीने तीन हजारांची आर्थिक मदत रोख स्वरूपात देण्यात आली. या निर्णयाने लोनखैरी ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- मृतकांच्या कुटुंबीयांना रोख राशी देताना सरपंच लीलाधर भोयर व उपसरपंच बोधिसत्व झोडापे.

Web Title: G.P. to the family of the deceased. Will provide financial support