शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोवारी समाजाने निवडणुकीतून एकजुटता दाखवावी :प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 11:38 IST

गोवारी समाजाने आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीतून एकजुटता दाखवावी व आपला प्रतिनिधी विधीमंडळात पाठवावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते ‘अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय भव्य मेळाव्या’त मार्गदर्शन करीत होते.

ठळक मुद्देआदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय मेळावा

नागपूर : आपल्या समाजाचे प्रतिनिधीच आपले प्रश्न सोडवू शकतात. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्या समाजाचे प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्याची गरज आहे. त्यामुळे गोवारी समाजाने त्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीतून एकजुटता दाखवावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

‘अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी समुदायाचा विदर्भस्तरीय भव्य मेळावा’ पासपोर्ट कार्यालयाजवळ न्यू मानकापूर येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ॲड. आंबेडकर म्हणाले, गोवारी समाजाने आपल्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी संघर्ष केला. लाखोंचा मोर्चा काढला. याच नागपुरात काढलेल्या मोर्चात शेकडो समाजबांधव शहीद झाले. या घटनेची तीव्रता लक्षात यावी म्हणून मखराम पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. परंतु, सरकारने तेव्हा त्या घटनेची पाहिजे तशी दखल घेतली नव्हती.

माना समाजाचाही तोच विषय होता. परंतु, त्यांचा प्रश्न मार्गी लागला. गोवारी समाजाचा का नाही? कारण माना समाजाने सामूहिकपणे निर्णय घेतला. आपला प्रतिनिधी निवडून दिला. गोवारी समाजानेही तसाच सामूहिक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार रमेश गजबे, अखिल भारतीय आदिवासी गोवारी शक्ती संघाचे अध्यक्ष भगवान भोंडे, रवी शेंडे, राजू लोखंडे, राहुल वानखेडे, विलास वाटकर, कुशल मेश्राम, विवेक हाडके, प्रफुल्ल मानके, राहुल दहीकर प्रामुख्याने उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी