विदर्भ दौऱ्यासाठी राज्यपालांचे आगमन
By Admin | Updated: November 5, 2014 00:54 IST2014-11-05T00:54:37+5:302014-11-05T00:54:37+5:30
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मंगळवारी रात्री ८.३० वाजता मुंबईहून विमानाने नागपूर येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी स्वागत केले.

विदर्भ दौऱ्यासाठी राज्यपालांचे आगमन
दोन दिवस अमरावतीत : गडचिरोलीतही जाणार
नागपूर: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मंगळवारी रात्री ८.३० वाजता मुंबईहून विमानाने नागपूर येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त के.के. पाठक, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे उपस्थित होते. ५ आणि ६ तारखेला राज्यपाल अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ६ तारखेला ते गडचिरोली जिल्ह्याला भेट देणार आहे.
७ तारखेला ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)