राज्यपालांनी घेतले संघभूमी व दीक्षाभूमीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:22 IST2020-07-27T11:21:39+5:302020-07-27T11:22:01+5:30

सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृतीमंदिर परिसराला भेट दिली.

The Governor visited Sanghbhumi and Deekshabhoomi | राज्यपालांनी घेतले संघभूमी व दीक्षाभूमीचे दर्शन

राज्यपालांनी घेतले संघभूमी व दीक्षाभूमीचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृतीमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर राज्यपाल दीक्षाभूमीला रवाना झाले. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थीकलशाचे दर्शन घेतले.
राज्यपाल तीन दिवसांच्या नागपूर-वर्धा दौºयावर आले होते. त्यांनी रविवारी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमाला भेट दिली होती.

 

Web Title: The Governor visited Sanghbhumi and Deekshabhoomi