राज्यपाल पुढील आठवड्यात नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:55+5:302021-01-08T04:24:55+5:30
नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे १२ ते १७ जानेवारी या कालावधीत नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ...

राज्यपाल पुढील आठवड्यात नागपुरात
नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे १२ ते १७ जानेवारी या कालावधीत नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते ताडोबा अभयारण्य व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला भेट देतील.
मंगळवार १२ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन होईल. १३ जानेवारी रोजी ते वरोऱ्याकडे प्रयाण करतील. १३ ते १५ जानेवारी या कालावधीत ते ताडोबा अभयारण्याला भेट देणार आहेत. १५ जानेवारी रोजी दुपारी कालिदास संस्कृत विद्यापीठात पोहोचतील व त्यांच्या उपस्थितीत डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञानार्जन केंद्र इमारतीचे उद्घाटन होईल. शनिवार १६ जानेवारी रोजी राजभवन येथे आयोजित ‘ऑईल आणि गॅस कॉन्झर्वेशन ड्राईव्ह-सक्षम-२०२१’ या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दुपारी बारा ते दीड दरम्यान दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्राला भेट देतील. सायंकाळी पाच वाजता राजभवनात कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात येईल. रविवारी दुपारी पावणेपाच रोजी ते मुंबईकडे रवाना होतील.