राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बुधवारपासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 21:06 IST2022-08-02T21:05:35+5:302022-08-02T21:06:10+5:30
Nagpur News राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बुधवार, ३ ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या नागपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बुधवारपासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर
नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बुधवार, ३ ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या नागपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. कोश्यारी यांचे विमानाने बुधवारी रात्री ८.३० वाजता नागपूरला आगमन होईल. स्थानिक प्रशासनाकडून स्वागताचा स्वीकार करून ते राजभवन येथे मुक्काम करतील.
राज्यपाल कोश्यारी हे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या शताब्दी महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर त्यांचे राजभवन येथे आगमन होईल. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे दुपारी १२ वाजता तनुजा नाफडे लिखित ‘राग-रंजन’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. रात्री ८ वाजता विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.