राज्यपाल भगत सिंह कोश्यारी शुक्रवारी नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 10:51 IST2021-06-10T10:51:09+5:302021-06-10T10:51:45+5:30
Nagpur News राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे ११ जून रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी शुक्रवारी नागपुरात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे ११ जून रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शासकीय विमानाने मुंबई येथून आगमन होईल. विमानतळावरून राजभवनसाठी प्रयाण करतील. राज्यपाल कोश्यारी हे १२ जून, १३ जूनपर्यंत राजभवन येथे मुक्काम करतील.१४ जून रोजी दुपारी २.३० वाजता राजभवन येथून विमानतळासाठी रवाना होतील. राज्यपाल दुपारी ३ वाजता शासकीय विमानाने मुंबईसाठी प्रयाण करतील.