राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोमवारपासून नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 20:15 IST2022-12-17T20:14:56+5:302022-12-17T20:15:36+5:30
Nagpur News राज्यपाल भगतसिंह कोश्यारी १९ डिसेंबरपासून नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा हा २४ डिसेंबरपर्यंत असेल.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोमवारपासून नागपुरात
नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी १९ डिसेंबरपासून नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा हा २४ डिसेंबरपर्यंत असेल.
सोमवारी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते राजभवनला जातील. २० डिसेंबर राखीव. २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.२५ वाजता रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या ११ व्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहतील. दुपारी ४.३० वाजता राजभवन येथे आयोजित मोहजाल या पथनाट्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील.
२२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान या विषयावर जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्यासमवेत राजभवन नागपूर येथे आढावा बैठक. २३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक.
२४ डिसेंबर सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमारेषेवरील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासमवेत बैठक. त्यानंतर दुपारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित कुलगुरूंच्या संमेलनास उपस्थित राहतील.