...
प्रकल्पातून वर्षाला मिळणार १२ हजार कोटींचे उत्पन्न
हा प्रकल्प ५३ हजार कोटी रुपये किमतीचा असली तरी यातून वर्षाला १२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. पेयजल, उद्योग, मत्सोत्पादन, सौर उर्जा निर्मिती, पर्यटन, कृषी उत्पादकतेतील वाढ अशा सर्व माध्यमातून हे उत्पन्न वाढण्यासोबतच रोजगार निर्मितीही वाढणार आहे. अवघ्या साडेपाच ते सहा वर्षात निर्मिती मूल्याची परतफेड करणारा आणि विदर्भाला नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प रेंगाळत आहे. परिणामत: त्याची किंमतही दिवसेंदिवस वाढत आहे.
...
कोट
राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने ही दिरंगाई सुरू आहे. विदर्भातील जनतेची संवैधानिक मूल्ये पायदळी तुडविणे टाळण्यासाठी, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने हा प्रकल्प तातडीने स्वीकारून पूर्ण करावा. निधीची पूर्तता करावी.
- ॲड. अविनाश काळे, संयोजक, लोकनायक बापूजी अणे स्मारक समिती
...