महात्मा गांधींच्या तत्त्वांवरच सरकारचे काम : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:50 IST2018-10-02T21:49:39+5:302018-10-02T21:50:23+5:30
महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सामान्य जनतेला तर जोडलेच शिवाय त्यांनी देशाला स्वयंशासन, स्वच्छता, ग्रामविकास ही मूल्येदेखील दिली. त्यांच्या तत्त्वावरच केंद्र व राज्य शासन चालत असून जनतेपर्यंत महात्मा गांधी यांची मूल्ये पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता सेवा संदेश पदयात्रेत ते सहभागी झाले होते.

महात्मा गांधींच्या तत्त्वांवरच सरकारचे काम : देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सामान्य जनतेला तर जोडलेच शिवाय त्यांनी देशाला स्वयंशासन, स्वच्छता, ग्रामविकास ही मूल्येदेखील दिली. त्यांच्या तत्त्वावरच केंद्र व राज्य शासन चालत असून जनतेपर्यंत महात्मा गांधी यांची मूल्ये पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता सेवा संदेश पदयात्रेत ते सहभागी झाले होते.
गजानन नगर येथून सुरू झालेल्या या पदयात्रेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.सुधाकर कोहळे, आ.गिरीश व्यास, आ.अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, लघु उद्योग विकास मंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. महात्मा गांधी यांनी देशाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याच तत्त्वावर चालत आहेत. स्वच्छ भारत अभियानाचे पाऊल त्यातूनच उचलण्यात आले आहे. १९४७ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्रात ५० लाख शौचालये बांधण्यात आली व ४५ टक्के लोकांना त्याचा फायदा झाला. मात्र २०१४ नंतर केवळ तीन वर्षातच आम्ही ६० लाख शौचालय बांधली व १०० टक्के लोकांपर्यंत शौचालयं पोहोचविली. राज्य आज स्वच्छतेकडे वेगाने वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा ‘सुपरफास्ट’ वेग
सकाळी ७ च्या सुमारास गजानन नगर येथून पदयात्रेला सुुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती. प्रियंकावाडी-रिंग रोड क्रॉस-छत्रपती हॉल-जनता हायस्कुल गल्ली- रिंग रोड प्रगती कॉलनी- तांबे हॉस्पिटल-वर्धा रोड-साई मंदिर-गजानन मंदिर-बौध्द विहार-देवनगर- नेहरूनगर-कसबेकर चौक- नरगुंदकर राजयोग-वर्धा रोड-हल्दीराम-अमर एन्क्लेव्ह-वृंदावन या मार्गाने परत गजानन नगरात दाखल झाली. या पदयात्रेत मुख्यमंत्र्यांच्या चालण्याचा वेग पाहून कार्यकर्तेदेखील थक्क झाले. अनेक जणांना धाप लागत असताना मुख्यमंत्री मात्र उत्साहाने आणि वेगाने चालत होते. पदयात्रेदरम्यान भजन मंडळाने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वैष्णव जन को’ हे भजन म्हटले.