शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

अंत्योदयाच्या विचारावर सरकारचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:09 IST

पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी साम्यवादी व पुंजीवादी अर्थव्यवस्थेतील त्रुटींचा अभ्यास करून अंत्योदयाच्या विकासासाठी आर्थिक व सामाजिक विचार मांडला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस : ‘पं. दीनदयाल गाथा’ महानाट्याचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी साम्यवादी व पुंजीवादी अर्थव्यवस्थेतील त्रुटींचा अभ्यास करून अंत्योदयाच्या विकासासाठी आर्थिक व सामाजिक विचार मांडला. स्वत: प्रसिद्धीपासून दूर राहिले. जन्मलेल्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे व त्यासाठी लागणारी व्यवस्था उभी करणे हे आपले कर्तव्य आहे, हे त्यांनी सांगितले. त्यांच्या याच विचारावर समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार काम करीत आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.प्रयास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे पं. दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पं. दीनदयाल गाथा’ हे महानाट्य शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी खा. डॉ. विकास महात्मे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, आ.डॉ. मिलिंद माने, माजी खा. दत्ता मेघे आदी उपस्थित होते.नितीन गडकरी म्हणाले, पं. दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या अंत्योदयाचा विचार सामाजिक, आर्थिक चिंतनावर आधारित आहे. समाजातील शोषित, पीडित माणसाची परमेश्वर समजून सेवा करा. त्यांचा उद्धार करा, हाच आमच्या आर्थिक भूमिकेचा पाया आहे. हा विचार पुढे नेत केंद्र सरकारने जनधनअंतर्गत ३० कोटी बँक खाते उघडले आहेत. देशातील एक कोटी लोक सायकलरिक्षा ओढायचे. त्यांच्यासाठी ई-रिक्षा आणली. गरिबांचे हार्ट व कॅन्सरचे आॅपरेशन केले जात आहेत. नागपुरात ५० हजार गरिबांना फक्त तीन लाख रुपयात घर दिले जाणार आहे. या जनसेवेतून पं. दीनदयाल यांचा संकल्प पूर्ण करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.उद्घाटन सोहळ्यानंतर गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांनी महानाट्य पाहिले. या महानाट्याच्या माध्यमातून पंडितजींचा विचार सामान्यांपर्यंत सहजपणे पोहचेल, असा विश्वास या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.प्रमुख मार्गदर्शक जयप्रकाश गुप्ता यांनी महानाट्याच्या निर्मितीमागील भूमिका व त्यासाठी घेतलेल्या परिश्रमाची माहिती दिली. याप्रसंगी या महानाट्याचे निर्माता शक्ती ठाकूर, लेखक विनोद इंदूरकर व दिग्दर्शक जयंत देशमुख यांचा मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.फडवीसांनी केला गडकरींचा सत्कारकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नितीन गडकरी यांना अतिरिक्त मंत्रालय सोपविण्यात आले. यानिमित्ताने यावेळी आयोजकांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडकरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी या प्रसंगाला दाद दिली.महानाट्यातून उलगडला जीवनपटया महानाट्याच्या माध्यमातून पं. दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनपट उलगडला. त्यांनी समाजाला दिलेला विचार मांडण्यात आला. पंडितजींची मुख्य भूमिका योगेश परिहार यांनी साकारली. याशिवाय नितीन पात्रीकर (यादोराव जोशी), शक्ती रतन (दत्तोपंत ठेंगडी), विनोद राऊत (अटलबिहारी वाजपेयी), अमोल तेलपांडे (गोळवलकर गुरुजी), संजय रंधे (बाळासाहेब देवरस), रमेश लखमापुरे (डॉ. शामाप्रसाद मुखर्जी), वत्सला अंबोणे (मामीजी), निकेतन सहारे (आॅफिसर), अंश रंधे (बूट पॉलिशवाला), दक्ष राठी (बाल स्वयंसेवक) यांनी या नाटकात भूमिका वठवल्या.राज्य सरकारचा बेस्ट आर्टिस्टचा अवॉर्ड विजेत्या भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीच्या शहर उपाध्यक्ष प्रियंका ठाकूर यांनी या नाटकासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले. या नाटकाचे सादरीकरण भोपाळ व रायपूर, लखनौ येथेही होणार आहे.