शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासन म्हणते रबी हंगामात पीक उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:48 IST

खरीपानंतर पाण्याअभावी रबी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु शासन मात्र आलबेल असल्याचे सांगते. कारण रबी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे. म्हणून प्रशासनानुसार रबीतील पीक परिस्थिती उत्तम आहे.

ठळक मुद्देविभागातील गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त : ६८ गावात घेतलेच नाही पीक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीपानंतर पाण्याअभावी रबी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु शासन मात्र आलबेल असल्याचे सांगते. कारण रबी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे. म्हणून प्रशासनानुसार रबीतील पीक परिस्थिती उत्तम आहे.मागील वर्षी कमी पावसामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला. उत्पादनात घट झाली. शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमाही झाली. मात्र अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. नदी, धरणात कमी पाणी असल्याने रबी पिकांसाठी शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळाले नाही. यामुळे पाहिजे त्या प्रमाणात फायदा झाला नसल्याचे सांगण्यात येते. अनेक शेतकऱ्यांनी तर रबीत पीकच घेतले नसल्याची माहिती आहे. पिकांना मिळालेला भावही समाधानकारक नसल्याची ओरड होत आहे. असे असताना शासन दरबारी मात्र सर्व आलबेल असल्याचे चित्र आहे. नागपूर विभागात १६६ गावांमध्ये रबीचे पीक घेण्यात येते. यंदा फक्त ९८ गावांमध्ये रबीचे पीक घेण्यात आले. या गावांमध्ये पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. म्हणजे पीक परिस्थिती उत्तम आहे. ६८ गावांमध्ये यंदा पीकच घेण्यात आले नाही. यात सर्वाधिक ६४ गाव गडचिरोली जिल्ह्यातील आहेत तर चार गाव भंडारा जिल्ह्यातील आहेत. पाणी नसल्याने पीक घेण्यात आले नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीVidarbhaविदर्भ