शासकीय तंत्रनिकेतनच्या शताब्दी वर्षसोहळ्याला प्रारंभ
By Admin | Updated: July 16, 2014 01:19 IST2014-07-16T01:19:40+5:302014-07-16T01:19:40+5:30
उपराजधानीसोबतच मध्य भारतातील महत्त्वाची तंत्रनिकेतन संस्था असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या स्थापनेला सोमवारी १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने संपूर्ण वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात

शासकीय तंत्रनिकेतनच्या शताब्दी वर्षसोहळ्याला प्रारंभ
नागपूर : उपराजधानीसोबतच मध्य भारतातील महत्त्वाची तंत्रनिकेतन संस्था असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या स्थापनेला सोमवारी १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने संपूर्ण वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. यादरम्यान निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्या हस्ते या सोहळ्याची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
शासकीय तंत्रनिकेतन नागपूरची स्थापना १४ जुलै १९१४ रोजी झाली होती. १०० वर्षांचा इतिहास लाभलेले शासकीयतंत्र निकेतन ही राज्यातील सर्वात जुनी तंत्रनिकेतन संस्था आहे. सन १९१४ मध्ये १६ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने सुरू झालेल्या संस्थेत आज दोन हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. यंदाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने निरनिराळ्या कार्यशाळा, स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे. शताब्दी वर्षाचा समारोपीय कार्यक्रम सोहळा डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती गुलाबराव ठाकरे यांनी दिली. यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य दीपक कुळकर्णी उपस्थित होते.
शताब्दी वर्षाची सुरुवात रक्तदान व नेत्रदानाने
तंत्रनिकेतनच्या शताब्दी सोहळ्याची सुरुवात औपचारिक कार्यक्रमाने करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिर, वादविवाद स्पर्धा, वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा अशा स्पर्धा घेण्यात आल्या.
१०० व्या वर्षानिमित्त संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी रक्तदान करून १०० बाटल्या रक्त जमा केले तर १०० जणांनी नेत्रदानाचे अर्जदेखील भरले, अशी माहिती संस्थेचे प्रभारी प्राचार्य दीपक कुळकर्णी यांनी दिली.
याशिवाय संस्थेतील जुन्या विद्यार्थ्यांसाठी ‘पॉलिटेकमित्र’ या नावाने ‘अॅल्युम्नी असोसिएशन’ची नोंदणी करण्यात आली आहे.
माजी विद्यार्थ्यांनी स्र१्रल्लू्रस्रं’@ॅस्रल्लँस्र४१.ंू.्रल्ल या ‘ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)