शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

‘मारबत महोत्सवा’साठी सरकारचा पुढाकार : पालकमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 21:17 IST

लोकमतमध्ये उमटलेल्या ‘एमटीडीसीला मारबत महोत्सवाचा विसर’ या मथळ्याखालील बातमीची दखल राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. त्याच बातमीचा उल्लेख करीत त्यांनी ‘मारबत महोत्सवा’साठी राज्य सरकार पुढाकार घेईल, अशी घोषणा आज नागपुरात केली.

ठळक मुद्दे‘मारबत’वरील गीताचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २० ऑगस्ट रोजी दैनिक लोकमतमध्ये उमटलेल्या ‘एमटीडीसीला मारबत महोत्सवाचा विसर’ या मथळ्याखालील बातमीची दखल राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. त्याच बातमीचा उल्लेख करीत त्यांनी ‘मारबत महोत्सवा’साठी राज्य सरकार पुढाकार घेईल, अशी घोषणा आज नागपुरात केली.

सोमवारी श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात ‘बकाल’ चित्रपटातील ‘घेऊन जा गे मारबत’ या नागपुरातील प्रसिद्ध मारबत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या गाण्याचे लोकार्पण बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी काहीच दिवसापूर्वी मारबत महोत्सवाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची बातमी लोकमतमध्ये वाचल्याचा उल्लेख केला. मारबत महोत्सव हा आपल्या इतिहास आणि संस्कृतीतून मिळालेला वारसा आहे. या महोत्सवाला आणखी उभारी देण्याची गरज असून, यासाठी सरकार पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले. आम्ही या बातमीची आणि महोत्सवाची दखल घेतली असून, सरकारी यंत्रणा या महोत्सवात सहभाग घेतील आणि हा महोत्सव जगपातळीवर घेतला जाईल, असे खंबीर आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले. ‘घेऊन जा गे मारबत’ हे गाणे नागपुरातील गीत लेखक सुरेंद्र मसराम यांनी लिहिले असून, त्याला मोरेश्वर निस्ताने यांनी संगीतबद्ध केले आहे. तर आदर्श शिंदे व धनश्री देशपांडे या आघाडीच्या गायकांनी स्वरबद्ध केले आहे. याप्रसंगी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, दिग्दर्शक समीर आठल्ये, ज्येष्ठ अभिनेता देवेंद्र दोडके, अभिनेता चैतन्य मेस्त्री, अभिनेत्री जुई बेंडखळे, कथाकार विनोद देशपांडे, नृत्य दिग्दर्शक दिलीप मेस्त्री व दीपा मेस्त्री, रूपाली कोंडेवार-मोरे, मालती दादलानी उपस्थित होते. यावेळी पिवळी मारबत उत्सव समितीचे प्रकाश गौरकर व काळी मारबत उत्सव समितीचे मिलिंद मदने यांचा सत्कार करण्यात आला.एमटीडीसीकडून सातत्याने डावलला जातोय ‘मारबत महोत्सव’इंग्रजी सत्तेविरोधात निर्माण झालेल्या आक्रोशाला परंपरेचे आवरण घालत, देशभक्तांना एकत्रित आणण्याच्या हेतूने १३९ वर्षांपूर्वी नागपुरात ‘मारबत महोत्सव’ आकाराला आला. इंग्रजांच्या नजरेत देशभक्तांचा आक्रोश भरू नये म्हणून त्याला पुतणा मावशी व श्रीकृष्णाचा संदर्भ देऊन हा महोत्सव वाढत गेला. मात्र, या महोत्सवाकडे शासनाचे कधीच लक्ष गेले नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)नेही या महोत्सवाला उभारी देण्याचे कधीच प्रयत्न केले नाही. नागपूर विभाग आणि मुख्य कार्यालयाच्या समन्वयाअभावी हा महोत्सव अजूनही एमटीडीसीच्या यादीत आलेला नाही, हे विशेष. नेमकी हीच बाजू प्रकाशात आणण्याचे कार्य लोकमतने केले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर