शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला : आशिष देशमुख यांचा आमदारकीला ‘रामराम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:14 IST

मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला. मात्र त्यांनी अद्यापही भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत.

ठळक मुद्देभाजपला अद्याप सोडचिठ्ठी नाही, काँग्रेसचा हात पकडणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला. मात्र त्यांनी अद्यापही भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत.आशिष देशमुख हे काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातून २०१४ साली निवडून आले होते. मात्र वर्षभरानंतरच देशमुख यांनी राज्य शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्यांनी नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनही केले होते. वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र पाठविल्यानंतर देशमुख राजीनामा देतील असे अंदाज लावण्यात येत होते, मात्र त्यांनी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. अखेर मंगळवारी त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले. बुधवारी ते मुंंबईला जाऊन विधानसभा अध्यक्षांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, देशमुख यांच्या पुढील राजकीय भविष्याबाबत विविध कयास लावण्यात येत असून ते पुढील निवडणूक नेमकी कुठून लढणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.सेवाग्राममध्ये राहुल गांधींचे केले स्वागतआशिष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना राजीनाम्याचे पत्र पाठविले व त्यानंतर त्यांनी थेट सेवाग्राम गाठले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभेदरम्यान देशमुख यांनी मंचावर येऊन त्यांचे स्वागत केले व एक पुस्तकदेखील भेट दिले. यावेळी दर्शकांमध्ये त्यांचे वडील व माजी मंत्री रणजित देशमुख हेदेखील उपस्थित होते.अद्याप काँग्रेस प्रवेश नाही : आशीष देशमुख‘लोकमत’ने आशिष देशमुख यांच्याशी संपर्क केला असता अद्याप आपण काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी मी विदर्भात सगळीकडे फिरलो. येथील शेतकरी, तरुणाईच्या समस्या मागील चार वर्षांपासून सुटलेल्या नाही. यासंदर्भात पक्ष व राज्य सरकारकडे मी वारंवार लक्ष वेधले, मात्र यात कोणताही फरक दिसला नाही. शेतकरी व जनतेचा सरकारने भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सत्याचा मार्ग स्वीकारत मी राजीनामा दिला आहे. मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. यापुढील निर्णय मी लवकरच घेईल, असेदेखील त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखMLAआमदार