‘दलित’ शब्दाचा उपयोग थांबविण्याबाबत शासन अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:55 IST2017-11-29T23:46:45+5:302017-11-29T23:55:01+5:30

शासकीय अभिलेखांतून दलित शब्द वगळणे आणि भविष्यामध्ये या शब्दाचा उपयोग थांबविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करीत असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी देण्यात आली.

The government has been favorable to stop the use of the term 'Dalit' | ‘दलित’ शब्दाचा उपयोग थांबविण्याबाबत शासन अनुकूल

‘दलित’ शब्दाचा उपयोग थांबविण्याबाबत शासन अनुकूल

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती१२ डिसेंबरला बैठक घेण्याचा आदेश

आॅनलाईन लोकमत
नागपूर : शासकीय अभिलेखांतून दलित शब्द वगळणे आणि भविष्यामध्ये या शब्दाचा उपयोग थांबविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करीत असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी देण्यात आली.
दलित शब्दाचा उपयोग थांबविण्यासाठी राज्य शासनाला अनेक पत्रे प्राप्त झाली आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात पंकज मेश्राम यांची जनहित याचिकाही प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने या विषयावर गांभिर्याने विचार करायला सुरुवात केली आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने या विषयावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत येत्या १२ डिसेंबर रोजी बैठक घेण्याचा आदेश दिला. तसेच, बैठकीमध्ये याचिकाकर्ते पंकज मेश्राम व त्यांचे वकील अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांना बाजू मांडण्याची अनुमती दिली.
सर्वोच्च न्यायालयाने ‘एस.पी. गुप्ता वि. राष्ट्रपती’ या प्रकरणामध्ये शासकीय अभिलेखातून ‘दलित’ शब्द काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. तसेच, लता सिंग वि. उत्तर प्रदेश शासन व अरुमुगम सेरवाई वि. तामिळनाडू शासन प्रकरणामध्ये ‘दलित’ शब्द घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. अनुसूचित जाती आयोगाचेही हेच मत आहे. ‘दलित’ शब्द भेदभावजनक, आक्षेपार्ह व जातीवाचक आहे. परिणामी, ‘दलित’ शब्दाऐवजी अनुसूचित जाती किंवा नवबुद्ध शब्दाचा सर्वत्र वापर करण्यात यावा असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

Web Title: The government has been favorable to stop the use of the term 'Dalit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.