शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

कोर्ट लिपिकाच्या घोटाळ्याची भरपाई करण्यासाठी सरकारने दिले ३० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:14 IST

Nagpur : २७ जानेवारीपर्यंत न्यायाधिकरणात जमा करणार रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोटार वाहन अपघात दावा न्यायाधिकरणमधील लिपिक दुर्योधन डेरे याने अपघात पीडितांच्या भरपाईमध्ये केलेल्या ४२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने आणखी ३० कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम येत्या २७ जानेवारीपर्यंत न्यायाधिकरणात जमा केली जाईल. यापूर्वी सरकारने दहा कोटी रुपये मंजूर केले होते.

यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अपघात पीडित महिला शिल्पा टोम्पे यांची जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सरकारने वरील निर्णयाची माहिती दिली. मोटार वाहन अपघात दावा न्यायाधिकरणने मंजूर केलेल्या भरपाईची रक्कम विमा कंपन्या व वाहन मालकांद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा केली जाते. त्यानंतर न्यायाधिकरणचे व्यवस्थापन ती रक्कम अपघात पीडितांना अदा करते. ही जबाबदारी डेरेकडे होती. त्याने भरपाईची रक्कम गिळंकृत करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे मित्र व नातेवाइकांसह विविध व्यक्तींच्या नावाने बँक खाती उघडली. त्यानंतर भरपाईची रक्कम या बोगस खात्यांमध्ये वळती केली. त्याने या पद्धतीतून एकूण ४२ कोटी रुपयांचा घोटाळा केला. 

त्याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी विविध कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे; परंतु सध्या अपघात पीडितांना तातडीने भरपाईची रक्कम मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाने ही रक्कम राज्य सरकारने जमा करावी, असा आदेश दिला होता. परिणामी, सरकारने आतापर्यंत ४० कोटी रुपये मंजूर केले आहेत. अॅड. नीलेश काळवाघे यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले. 

याचिकाकर्तीचे ३७ लाख पळवले याचिकाकर्तीच्या पतीचे अपघातात निधन झाले आहे. त्यामुळे त्यांनी अपघात न्यायाधिकरणमध्ये भरपाईचा दावा दाखल केला होता. २० जुलै २०२२ रोजी न्यायाधिकरणने त्यांना ३१ लाख १० हजार २८१ रुपये भरपाई मंजूर केली होती. त्यानंतर विमा कंपनीने न्यायाधिकरणमध्ये व्याजासह ४९ लाख १६ हजार १९६ रुपये जमा केले होते. दरम्यान, घोटाळेबाज डेरेने त्यातील ३७ लाख १५ हजार १९६ रुपये दुसऱ्या खात्यांमध्ये वळते केले.

टॅग्स :nagpurनागपूर