शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी दाखविली शासकीय कर्मचाऱ्यांनी शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 20:33 IST

जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय, शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीच्यावतीने सोमवारी लाक्षणिक संप पुकारला होता.

ठळक मुद्देसंविधान चौकात केला लाक्षणिक संपजिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा भरभरून प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय, शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीच्यावतीने सोमवारी लाक्षणिक संप पुकारला होता. या संपात शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या एकजुटीचा परिचय देत, कर्मचाऱ्यांची एकता दाखवून दिली. कुणाचेही नेतृत्व न स्वीकारता संघटनांनी दाखविलेला समन्वय या संपाच्या माध्यमातून दिसून आला. संविधान चौकात संपकऱ्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेशी संलग्नित सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनी भरभरून संपाला प्रतिसाद दिला.या संपामुळे जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयाची कामे खोळंबली होती. जिल्हा परिषदेचे व खासगी अनुदानित शाळेचे शिक्षकही संपात सहभागी असल्याने शाळा बंद होत्या. जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्यात, खासगीकरण व कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करावे, केंद्राप्रमाणे सर्व वेतन भत्ते मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारला होता. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून समन्वय समितीच्या माध्यमातून ५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम सुरू आहे. सोमवारी लाक्षणिक संप यशस्वी करून ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा समन्वय समितीने दिला.जिल्हा परिषदमध्ये शुकशुकाटया लाक्षणिक संपामध्ये मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जि.प.मुख्यालयातील प्रत्येक विभागात शुकशुकाट होता. कर्मचारी संघटनांनी संपासाठी प्रत्येक विभाग प्रमुखासह सीईओंनासुद्धा लेखी सूचना केल्या होत्या. त्यामुळे सोमवारी विभाग प्रमुख यांच्यासह बोटावर मोजण्याइतके कर्मचारी सोडल्यास संपूर्ण कार्यालयात शुकशुकाट होता.जि.प.च्या शाळा बंदसंपामध्ये सर्वाधिक सक्रिय असणारा वर्ग शिक्षकांचा होता. जि.प.मध्ये असणाऱ्या  शिक्षकांच्या विविध संघटनांनी संपात सहभाग घेतला होता. शिक्षकांनी मुख्यालयातील शिक्षण अधिकारी, पं.स.वर गटशिक्षण अधिकाऱ्याला संपासाठी लेखी सूचना दिल्या होत्या. शिक्षकांनी शाळा बंद ठेवून संपात सहभाग घेतला होता. शिक्षकांच्या सक्रिय सहभागीमुळे संप खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.या संघटनांचा होता सहभागम.रा. शिक्षक परिषद, शिक्षक भारती, विज्युक्टा, विदर्भ शिक्षक संघटना, म.रा. शिक्षक संघ, म.रा. शिक्षक समिती, म.रा. शिक्षक सेना, म.रा. शिक्षक व शिक्षकेत्तर नवनिर्माण सेना, अ.भा. प्रा. शिक्षक संघ, म.रा. मागासवर्गीय शिक्षक संघटना, म.रा. कास्ट्राईब शिक्षक संघटना, म.रा. पुरोगामी शिक्षक समिती, म.रा. प्रा. शिक्षक पदवीधर केंद्रप्रमुख सभा, काँग्रेस शिक्षक सेल, जि.प. केंद्रप्रमुख संघ, नागपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघ, म.रा. शिक्षण संस्था महामंडळ, म.रा. शारीरिक शिक्षण व शिक्षक महासंघ, बहुजन शिक्षक महासंघ, प्रहार शिक्षक संघटना, म.रा. जुनी पेन्शन हक्क संघटना, पेन्शन बचाव कृती समिती, ग्रामसेवक संघटना, जि.प. कर्मचारी महासंघ, म.रा. जि.प. कर्मचारी युनियन, म.रा. शासकीय व निमशासकीय लिपिक हक्क परिषद, म.रा. जि.प. लेखा कर्मचारी संघटना, म.रा. जि.प. लिपिकवर्गीय संघटना, म.रा. जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, म.रा. कृषी विभाग, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, म.आरोग्य प्रशासकीय कर्मचारी संघटना, जलसंपदा विभाग कर्मचारी संघटना, कृषी विभाग लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना, म.रा. कृषी सहायक संघटना, म.रा. कास्ट्राईब कर्मचारी संघटना

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारीagitationआंदोलन