शासनाचा राग पोलिसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:33+5:302021-04-07T04:09:33+5:30

--- पोलिसांचे नियोजन, आवश्यकता तेथेच पोलीस तहसील, गांधीबाग, इतवारीसारखी स्थिती शहरातील इतर भागात नव्हती. बहुतांश भागातील छोटी-मोठी दुकाने बंदच ...

The government is angry with the police | शासनाचा राग पोलिसांवर

शासनाचा राग पोलिसांवर

---

पोलिसांचे नियोजन, आवश्यकता तेथेच पोलीस

तहसील, गांधीबाग, इतवारीसारखी स्थिती शहरातील इतर भागात नव्हती. बहुतांश भागातील छोटी-मोठी दुकाने बंदच होती. रखरखत्या उन्हात आवश्यकता नसताना पोलिसांना उभे करण्याऐवजी या वेळी पोलीस आयुक्तांनी आवश्यकता तेथेच पोलीस असे नियोजन केले आहे. शीघ्र कृती दलाची पथके ठिकठिकाणी सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे जेथे कुठे गर्दी अथवा गडबड झाली किंवा कुठे काही वाद झाल्यास त्या ठिकाणी तातडीने चारही बाजूंचे गस्ती पथकाचे पोलीस पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. संतप्त जनता किंवा व्यापाऱ्यांसोबत वाद घालू नये, बळाचा वापर करू नये, त्याऐवजी समंजसपणे परिस्थिती हाताळावी, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

----

तहसील ठाण्यात तीन गुन्हे दाखल

दरम्यान, मंगळवारी दुपारी अनेकांनी गर्दी करून कोरोनाचा धोका वाढविण्याची कृती केल्यामुळे तहसील ठाण्यात कलम १८८ (साथ रोग प्रतिबंधक कायदा) अन्वये दोन, तर कलम २८३ (वाहतुकीला अडथळा निर्माण करणे) अन्वये तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

---

Web Title: The government is angry with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.