शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचा कुजबा गावाला धोका आहे का? हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 20:02 IST

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचा कुही तालुक्यातील कुजबा गावाला धोका आहे का व या गावाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विभागीय आयुक्तांना केली व यावर १० जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांना मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचा कुही तालुक्यातील कुजबा गावाला धोका आहे का व या गावाचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विभागीय आयुक्तांना केली व यावर १० जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.या गावाच्या पुनर्वसनासाठी ईश्वर लांबट यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, जिल्हाधिकारी व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रतिज्ञापत्राकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुजबा गाव प्रभावित होत नाही. परिणामी, या गावाचे पुनर्वसन करण्याची गरज नाही असे उत्तर या दोघांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. परंतु, विभागीय आयुक्तांनी जारी केलेल्या गोसेखुर्द प्रभावित गावांच्या यादीमध्ये कुजबा गावाचा १७१ व्या क्रमांकावर समावेश करण्यात आला आहे. ही माहिती न्यायालयाला देण्यात आल्यानंतर न्यायालयाने विभागीय आयुक्तांना वरील आदेश दिला व उत्तर सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल विचारात घेण्यास सांगितले.याचिकाकर्त्यानुसार, ६ जुलै २०१८ रोजी मुसळधार पाऊस झाल्यामुळे कुजबा गावात पाणी साचले होते. अनेक घरे पाण्याखाली आली होती. गावाजवळ आम नदी आहे. या नदीचे पाणी गावात शिरते. नागरिकांची तक्रार लक्षात घेता उमरेडचे तहसीलदार व उप-विभागीय अधिकारी यांनी गावाचे संयुक्त निरीक्षण केले होते. एकंदरीत परिस्थिती पाहता त्यांनी गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होण्याची सूचना केली होती. परिणामी, गावकऱ्यांनी सरकारला मदत मागितली. परंतु, त्यांना सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रकाश रणदिवे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प