शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीकच्या काटोल भागात गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेसचे चाक तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:41 IST

दिल्ली मार्गावर गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेसचे चाक तुटल्याची घटना रविवारी सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान घडली. ही गाडी नागपूरकडे येत होती. काटोलजवळ सोनखांब ते कोहली स्टेशनच्या मध्ये ही गंभीर घटना घडली. गाडीच्या ए-२ कोचमधील एका रेल्वे कर्मचाऱ्याला ही बाब लक्षात आल्याने त्याने चेन पुलिंग करून ताबडतोब गाडी थांबविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देकोचमधील रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली मार्गावर गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेसचे चाक तुटल्याची घटना रविवारी सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान घडली. ही गाडी नागपूरकडे येत होती. काटोलजवळ सोनखांब ते कोहली स्टेशनच्या मध्ये ही गंभीर घटना घडली. गाडीच्या ए-२ कोचमधील एका रेल्वे कर्मचाऱ्याला ही बाब लक्षात आल्याने त्याने चेन पुलिंग करून ताबडतोब गाडी थांबविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यामुळे नागपूरकडे येणाऱ्या सहा गाड्यांना विलंब झाला.काटोलजवळ सोनखांब व कोहली स्टेशनच्या मध्ये रविवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीकडून येणाऱ्या ट्रेन क्रमांक १५०१५ गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेस ही गाडी नागपूरकडे येत होती. सकाळी ८.१५ वाजताच्या दरम्यान काटोलजवळ गाडीच्या ए-२ कोचच्या चाकाचा तुकडा पडला. त्यामुळे एका मोठा झटका बसला. या कोचमध्ये एक रेल्वेचा कर्मचारीही प्रवास करीत होता. त्यांना काहीतरी गंभीर प्रकार लक्षात आला. त्यांनी अलार्म चेन पुलिंग करून ताबडतोब गाडी थांबविली. खाली उतरुन पाहिल्यानंतर कोचचा चाक खंडीत झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तगेच कन्ट्रोल रुमला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी अ‍ॅक्सीडंट रिलीफ ट्रेन पोहचली व कोच वेगळा करण्याचे काम सुरू करण्यात आले. दुपारी १ वाजतापर्यंत हे काम सुरू होते. एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. मात्र या अपघातामुळे इटारसीकडून नागपूरकडे येणाऱ्या अनेक गाड्या ठप्प पडल्या. यामध्ये १६०९४ लखनउ एक्सप्रेस, २७९२ सिकंदराबाद एक्सप्रेस, २२६९२ राजधानी एक्सप्रेस, १२७२४ तेलंगना एक्सप्रेस, १२४१० गोंडवाना एक्सप्रेस आणि एक अन्य गाडी थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात