गोपीनाथ मुंडे संघर्षशील लोकनेते होते
By Admin | Updated: June 4, 2016 02:59 IST2016-06-04T02:59:18+5:302016-06-04T02:59:18+5:30
गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सदैव संघर्ष केला. सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या विस्तारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

गोपीनाथ मुंडे संघर्षशील लोकनेते होते
भाजपतर्फे श्रद्धांजली : कर्तबगार नेत्याची सदैव उणीव जाणवेल
नागपूर : गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सदैव संघर्ष केला. सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या विस्तारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कर्तबगार नेत्याची उणीव सदैव पक्षाला जाणवत राहील, अशा शब्दात भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शहर भाजपतर्फे द्वितीय पुण्यतिथी निमित्त ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. टिळक पुतळा महाल येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या प्रतिमेला श्रद्धासुमन अर्पण केले.
शहर संपर्क प्रमुख प्रमोद पेंडके यांनी मुंडे यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. मुंडे हे कार्यकर्त्यांचा सन्मान करणारे नेते होते. नागपूरवर त्यांचे विशेष प्रेम होते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शहर महामंत्री किशोर पलांदूरकर, प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी, संजय पेशने, बंडू सिरसाट, बाळू बांते, सतीश वडे, कमलेश पांडे, शिवनाथ पांडे, वामन लांजेवार, किशोर पेठे, प्रशांत कामडी, योगेश हेटे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.(प्रतिनिधी)