दरोड्याच्या तयारीतील गुंड गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:06 IST2021-05-23T04:06:45+5:302021-05-23T04:06:45+5:30

नागपूर : तलवार, चाकू घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन गुंडांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली. आशिष ऊर्फ मेंढी विजय ...

The goons in preparation for the robbery are gone | दरोड्याच्या तयारीतील गुंड गजाआड

दरोड्याच्या तयारीतील गुंड गजाआड

नागपूर : तलवार, चाकू घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन गुंडांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली.

आशिष ऊर्फ मेंढी विजय मेंढे, स्नेहल राजेंद्र शेंडे, रितिक ऊर्फ भुरू साहेबलाल समुद्रे अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांचे तीन साथीदार पळून गेले. शनिवारी पहाटे शांतीनगर पोलीस बाबा रामसुमेर नगरात गस्त घालत असताना राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ त्यांना काहीजण संशयास्पद अवस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि आशिष मेंढे, स्नेहल शेंडे तसेच रितिक समुद्रे त्या तिघांना पकडले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन समीर खान, रहमान ऊर्फ रम्मू तसेच समीरचा मित्र फरार झाले.

अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तलवार, चाकू, नायलॉन दोरी, मिरची पावडर जप्त केली. फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

---

Web Title: The goons in preparation for the robbery are gone