शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीसाठी गुंडांनी चालविल्या तलवारी; हल्ल्यात तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 10:37 IST

या युवतीसोबत सूरज ठाकरेची जुनी मैत्री आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्टीन या युवतीच्या जीवनात आला.

ठळक मुद्देकोराडीत घडली घटना

नागपूर : प्रेयसीला मिळविण्याच्या वादातून गुंडांनी तलवारीने ऐकमेकांवर हल्ला केल्याची घटना कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत मंगळवारी रात्री कृष्णा धाम झोपडपट्टीत घडली. यात तिघे जखमी झाले असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आतिश उर्फ ऑस्टीन रॉबर्ट फ्रान्सिस (२२, कृष्णा धाम सोसायटी), सूरज वामनराव ठाकरे (२३, जरीपटका) आणि नौशाद फारुख शेख (२३, आझाद कॉलनी) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. ऑस्टीन आणि सूरज कुख्यात गुन्हेगार आहेत. ऑस्टीनविरुद्ध खून, खुनाच्या प्रयत्नासह अनेक गुन्हे दाखल आहेत. या घटनेचे कारण २३ वर्षांची युवती आहे. या युवतीसोबत सूरज ठाकरेची जुनी मैत्री आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्टीन या युवतीच्या जीवनात आला.

युवती त्याच्याजवळ गेली. ती ऑस्टीनसोबत कृष्णा धाम झोपडपट्टीत राहू लागली. याची माहिती मिळताच सूरज संतप्त झाला. त्याला युवती ऑस्टीनसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत असल्याचे समजले. सूरजने ऑस्टीनच्या खुनाचा बेत आखला. त्याची माहिती मिळाल्यामुळे ऑस्टीन सतर्क झाला. मंगळवारी रात्री १ वाजता सूरज आपला साथीदार नौशाद शेख, टिपू उर्फ फहिम खान आणि रज्या उर्फ राजा हातात तलवार घेऊन ऑस्टीनच्या घरी पोहोचले. रात्री उशिरा दार वाजल्यामुळे ऑस्टीन सतर्क झाला.

सूरजला पाहून त्यानेही तलवार काढली. खून करण्यासाठी ऑस्टीनने सूरज आणि त्याचा साथीदार नौशाद शेखवर हल्ला केला. सूरज आणि नौशाद जखमी झाला, परंतु आपल्याकडे येत असल्याचे पाहून ऑस्टीनच्या इतर दोन साथीदारांना सूरजने पकडले. तलवारीने हल्ला करून त्यांना जखमी केले. कृष्णाधाम झोपडपट्टीजवळ कोराडी पोलीस कर्मचारी तैनात होते. हल्ल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलीस येत असल्याचे पाहून जखमी अवस्थेतही सूरजने ऑस्टीनवर तलवारीने वार केले. पोलिसांनी त्वरित जखमींना रुग्णालयात दाखल केले. कोराडी पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

एका युवतीसाठी दोघे आपसात भिडले

‘एक फुल दो माली’च्या धर्तीवरील या प्रेमकथेत युवतीची भूमिका महत्त्वाची आहे. ती सूरजच्या अनेक दिवसांपासून संपर्कात होती. आपल्याला कर्जबाजारी केल्यानंतर युवतीने ऑस्टीनला हात पकडल्याचे सूरजचे म्हणणे आहे. घटनेच्या वेळी ती ऑस्टीनच्या घरातच होती. ऑस्टीनच्या कुटुंबीयांना युवतीचा या घटनेत हात असल्याची शंका आहे. पोलीस या दिशेने तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर