शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

नागपुरातील पाचपावली भागात  गुंडांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 13:58 IST

तरुणांच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुस-याला चाकू मारला. त्याचा बदला घेण्यासाठी गुंडांच्या एका टोळीने सोमवारी पहाटेपर्यंत पाचपावलीतील लाडपु-यात प्रचंड हैदोस घातला. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करून या गुंडांनी या भागात मोठी दहशत पसरवली होती.

ठळक मुद्दे२४ वाहनांची तोडफोड : प्रचंड दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तरुणांच्या दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने दुस-याला चाकू मारला. त्याचा बदला घेण्यासाठी गुंडांच्या एका टोळीने सोमवारी पहाटेपर्यंत पाचपावलीतील लाडपु-यात प्रचंड हैदोस घातला. दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करून या गुंडांनी या भागात मोठी दहशत पसरवली होती.लाडपु-यात राहणारे ललित हिरामण पाठराबे (वय ३२) आणि गोलू रमेश निखारे या दोघांमध्ये रविवारी मध्यरात्री भांडण झाले. प्रारंभी बाचाबाची आणि हाणामारी झाल्यानंतर पाठराबेने निखारेला चाकू मारला. याची माहिती कळताच निखारेचे गुंड साथीदार शूभम कटारे (वय २२), अंडा उर्फ गौरव अनिल पारवे (वय १८), विकी प्रकाश पराते (वय २२) आणि त्यांचे चार ते पाच सशस्त्र साथीदार लाडपु-यात चालून आले. त्यांच्याकडे चाकू, लाठ्या, रॉड होते. त्यांनी देवराव उमरेडकर यांच्या घरावर आधी हल्ला चढवला. त्यांच्या दाराला लाथा मारल्यानंतर निलेश नंदनवार, प्रवीण कुराडकरच्या घरापासून तो ज्योती अनंत बुराडे (वय ३२) यांच्या घरापर्यंतच्या मार्गावर असलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. आरोपी मोठमोठ्याने शिवीगाळ करून आरडाओरड करीत होते. त्यांनी तब्बल २४ वाहनांची तोडफोड केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. या घटनेची माहिती कळाल्यानंतर पाचपावली पोलीस लाडपु-यात पोहचले. तत्पूर्वीच आरोपी पळून गेले होते. सोमवारी पहाटे ज्योती बुराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर