ज्वेलर्सच्या घरातून १.११ लाखांचा मुद्देमाल पळविला
By दयानंद पाईकराव | Updated: August 19, 2023 12:51 IST2023-08-19T12:50:37+5:302023-08-19T12:51:00+5:30
ज्वेलर्सच्या घरातून १.११ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ ऑगस्टला रात्री १०.३० ते १८ ऑगस्टला पहाटे पाच वाजताच्या दरम्यान घडली आहे.

ज्वेलर्सच्या घरातून १.११ लाखांचा मुद्देमाल पळविला
दयानंद पाईकराव
नागपूर : ज्वेलर्सच्या घरातून १.११ लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ ऑगस्टला रात्री १०.३० ते १८ ऑगस्टला पहाटे पाच वाजताच्या दरम्यान घडली आहे.
राकेश गंगाप्रसाद गुप्ता (वय ५१, रा. सरस्वती मुलींच्या शाळेजवळ) हे आपले घर बंद करून बाहेर गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरातील लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागीने व रोख ६० हजार असा एकुण एक लाख ११ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश दुबाले यांनी कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.