लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे पाहून मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर ते गया स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी १० मेपासून पहिली गाडी धावणार आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वाढते आणि ती सारखी वाढतच जाते. यंदाचेही तसेच आहे. नागपूर स्थानकावरून धावणारी प्रत्येक रेल्वेगाडी फुल्ल आहे. त्यातल्या त्यात बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. गाड्या कमी आणि प्रवासी जास्त असल्याने हे प्रवासी गाडीत सीट मिळाली तर ठिक अन्यथा जागा मिळेल त्या ठिकाणी बसून प्रवास करतात. अनेक प्रवासी चक्क टॉयलेटजवळ बसून प्रवास करतात. परिणामी त्यांच्यासोबतच अन्य प्रवाशांचीही कुचंबना होते. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर-गया-नागपूर या विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी १० मेपासून या विशेष गाडीला प्रारंभ होत आहे.
गाड्यांचे वेळापत्रकगाडी क्रमांक ०१२०३ नागपूर गया विशेष गाडी १० मे रोजी शनिवारी नागपूर स्थानकावरून दुपारी ३:४० वाजता सुटेल आणि रविवारी ११ मे रोजी रात्री ११:४५ वाजता गया येथे पोहचेल. गाडी क्रमांक ०१२०४ गया नागपूर विशेष गाडी मंगळवारी १३ मे रोजी गया येथून रात्री ८:३० वाजता नागपूरकडे सुटेल आणि गुरुवारी दुपारी ३:५० वाजता नागपूर स्थानकावर पोहचेल.
या स्थानकांवर राहिल थांबाया दोन्ही गाड्या जाता-येताना नरखेड, पांढूर्णा, आमला, बैतूल, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिक्की, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, भभूआ रोड, सासाराम, डेहरी ऑन सोन आणि गया.
१८ दोन्ही गाड्यांना १८ कोचया दोन्ही विशेष गाड्यांना एकूण १८ कोच राहतील. त्यात ६ जनरल, ४ थर्ड एसी (एकानॉमी), १ सेकंड एसी, ५ स्लिपर आणि २ लगेज कम गार्ड व्हॅनचा समावेश आहे.