लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होळी आणि धूलिवंदनाच्या सणानिमित्त प्रवाशांची विविध मार्गावर मोठी गर्दी होत असल्याचे ध्यानात घेऊन मध्य रेल्वेने आतापासूनच प्रवाशांसाठी खास नियोजन केले आहे. त्यानुसार मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर-पुणेसह २८ स्पेशल ट्रेन चालविण्याचे जाहीर केले आहे.
ट्रेन नंबर ०२१३९ ही विशेष गाड़ी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून ९, ११, १६ आणि १८ मार्च अर्थात दर रविवारी आणि मंगळवारी मध्यरात्री नागपूरसाठीनिघेल आणि दुपारी ३:१० वाजता येथे पोहचेल. त्याच प्रमाणे ट्रेन नंबर ०२१४० ही विशेष गाडी दर रविवारी आणि मंगळवारी (९, ११, १६ आणि १८ मार्चला) नागपूर स्थानकावरून रात्री ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचेल.
या गाड्यांना १७ डबे राहणार असून त्या उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबे घेणार आहे.
डबे आणि थांबेया गाड्यांना एकूण २४ डबे राहणार असून, दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर या गाड्या थांबणार आहेत.
पुणे - नागपूर - पुणेपुण आणि नागपूर येथून प्रवास करणाऱ्यांसाठी ०१४६९ ही स्पेशल ट्रेन ११ आणि १८ मार्चला, दर मंगळवारी पुणे येथून दुपारी ३:५० ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता नागपुरात पोहचेल. तर, नागपूरहून सुटणारी ०१४७० ही स्पेशल ट्रेन १२ आणि १९ मार्चला (बुधवारी) सकाळी ८ वाजता नागपूर स्थानकावरून सुटेल आणि रात्री ११:३० वाजता पुण्यात पोहचेल. स्पेशल ट्रेन १४६७ पुणे येथून बुधवारी, १२ आणि १९ मार्चला दुपारी ३:५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता पोहोचेल. तर, ०१४६८ ही स्पेशल ट्रेन गुरुवारी १३ आणि २० मार्चला सकाळी ८ वाजता नागपूरहून सुटेल आणि रात्री ११:३० वाजता पुण्याला पोहचेल.