शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी खूष खबर १२ होळी स्पेशल ट्रेन चालवणार

By नरेश डोंगरे | Updated: March 16, 2024 16:36 IST

यातील चार गाड्या नागपूर आणि बल्लारशाह मार्गे धावणार आहेत. शुक्रवारी या संबंधाने मध्य रेल्वेने तशी अधिकृत घोषणा केली आहे. 

नागपूर : आपल्या गावात, आपल्या नातेवाईकांत, मित्रमंडळीत जाऊन होळी धुळवडीचा आनंद घेण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांना मध्य रेल्वेकडून एक खुष खबर आहे. मध्य रेल्वेने यापूर्वी विविध मार्गावर होळी स्पेशल ११२ ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली होती. आता त्यात आणखी १२ स्पेशल ट्रेनची भर घातली आहे. यातील चार गाड्या नागपूर आणि बल्लारशाह मार्गे धावणार आहेत. शुक्रवारी या संबंधाने मध्य रेल्वेने तशी अधिकृत घोषणा केली आहे. 

विविध सणोत्सवाचा आनंद आपल्या गावात जाऊन नातेवाईकांसोबत, मित्रमंडळींसोबत घेण्याची योजना अनेक जण तयार करतात. मात्र, गाव दूर आणि रेल्वेत प्रचंड गर्दी असल्यामुळे आरक्षण मिळत नाही. त्यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाते अन् त्यांची गावात जाऊन सणोत्सव साजरा करण्याची ईच्छा तशीच राहते. ते ध्यानात घेऊन मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी होळीच्या सणानिमित्त ११२ रेल्वे स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय जाहिर केला होता. या गाड्यांचे तिकिट आरक्षित करण्यासाठी प्रवाशी मोठ्या संख्येत गर्दी करीत असल्याचे लक्षात आल्याने मध्य रेल्वेने आणखी १२ होळी स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला. या १२ स्पेशल ट्रेनपैकी ४ गाड्या नागपूर आणि बल्लारशाह मार्गे धावणार आहेत. अर्थात या दोन रेल्वे स्थानकावरून त्या प्रवाशांची चढ उतार करणार आहेत. 

नागपूर आणि बल्लारशाह स्थानकावर थांबणाऱ्या स्पेशल ट्रेन ०५३०३ गोरखपूर- महबूबनगर ही गाडी रविवार, २४ मार्चला सकाळी ६.४० वाजता नागपूर स्थानकावर थांबेल. त्यानंतर ती सकाळी १० वाजता बल्लारशाह स्थानकावर पोहचेल. 

०५०५१ छपरा- सिकंदराबाद ही गाडी रविवार ३१ मार्चला सकाळी ६.४० वाजता नागपूर स्थानकावर आणि नंतर सकाळी १० वाजता बल्लारशाह स्थानकावर पोहचेल.

०५३०४ महबूबनगर - गोरखपूर मंगळवार, २६ मार्चला पहाटे ३.१५ वाजता बल्लारशाह येथे तर सकाळी ६.३० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. ०५०५२ सिकंदराबाद - छपरा ही विशेष गाडी मंगळवार २ एप्रिलला पहाटे ३.१५ ला बल्लारशाह येथे  आणि सकाळी ०६.३० वाजता नागपूर स्थानकावर येईल.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेHoliहोळी 2023nagpurनागपूर