शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! उद्या आकाशात ढग, परवा जाेराचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 11:20 IST

नागपूरकरांना उबविणाऱ्या उकाड्याने त्रासविले : पारा ४१.४ अंशांवर

नागपूर : चटके देणाऱ्या उन्हाच्या झळा आणि उबविणाऱ्या दमट उकाड्याने नागपूरकरांना हैराण करून साेडले आहे. मंगळवारीही ४१.४ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली, जे सरासरीपेक्षा ६.३ अंशांनी अधिक हाेते. त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा नागपूरकरांना लागली आहे. मात्र, ही प्रतीक्षा संपणार आहे. हवामान खात्याकडून तशी ‘गुड न्यूज’ आली आहे. २२ जूनला आकाश ढगांनी व्यापणार असून, वादळ व विजांच्या कडकडाटांसह हलका पाऊस हाेईल. पण, त्यानंतर २३ राेजी जाेरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. तत्पूर्वी आणखी एक दिवस लाेकांना उकाडा सहन करावा लागेल.

हवामान विभागानुसार सध्या दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्वाेत्तर राज्यांकडे वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनची रेषा ११ जूनपासून आतापर्यंत एकाच स्थळी थांबली आहे. आनंदाची बाब म्हणजे आता मान्सून पश्चिम मध्य व दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरातून हाेत आंध्रप्रदेशच्या सीमावर्ती भागात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार हाेत आहे, ज्यामुळे मध्य भारतात आर्द्रता प्रवेश करू शकते. सायक्लाेनिक सर्क्युलेशनसह कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण-पश्चिम उत्तरप्रदेश आणि राजस्थानकडे तयार हाेत आहे. अरबी समुद्रातही हालचाल दिसून येत आहे. त्यामुळे वातावरण बदलेल आणि वेगावान वाऱ्यासह पाऊस हाेईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पारा ४० अंशांच्या खाली घसरेल आणि उकाड्यापासून दिलासा मिळेल.

साधारणपणे जूनच्या सुरुवातीपासून कमाल तापमान खाली घसरत असते आणि जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात मान्सून किंवा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी येत असतात. मात्र, यंदा जूनच्या सुरुवातीपासून पारा ४१ ते ४२ अंशांवर कायम आहे. उन्हाच्या झळा व दमट उकाड्याने नागरिकांना त्रासवून साेडले आहे. मंगळवारीही तापमान ६ अंशांच्या वर हाेते व उष्ण लाटेची स्थिती कायम हाेती. विदर्भाच्या इतर जिल्ह्यांतही पारा सरासरीपेक्षा ५ ते ८ अंशांच्या वर आहे. ४२.२ अंशांसह चंद्रपूर सर्वाधिक उष्ण आहे. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ वगळता इतर जिल्ह्यांत पारा ४० अंशांच्या वर नाेंदविण्यात आला.

मान्सूनपूर्व हालचाली कमजाेर

वातावरणात आर्द्रतेचा स्तर कमी असल्याने मान्सूनपूर्व हालचाली कमजाेर पडल्या आहेत. सध्या आर्द्रतेचा स्तर ५० टक्क्यांवर असून सायंकाळी ताे ३० टक्क्यांपर्यंत खाली येताे. त्यामुळे रात्रीही उष्ण वाऱ्याचा प्रभाव जाणवताे. यामुळेच मंगळवारी रात्रीचा पारा २९.४ अंश नाेंदविण्यात आला, जाे सरासरीपेक्षा ४ अंशांनी अधिक आहे. त्यामुळे रात्रीही उकाड्याचा त्रास जाणवताे.

टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊस