शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गोंदियाचे हृदय मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:24 IST

कर्त्या व्यक्तीचा ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झाल्याची माहिती मिळताच पशिने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या स्थितीतही स्वत:ला सावरत पत्नीने एक निर्णय घेतला, ....

ठळक मुद्देग्रीन कॉरिडोरने पहिल्यांदाच हृदयाचा प्रवास े चौघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी े अवयवदानासाठी पशिने कुटुंबाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्त्या व्यक्तीचा ‘ब्रेन डेड’ (मेंदू मृत) झाल्याची माहिती मिळताच पशिने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या स्थितीतही स्वत:ला सावरत पत्नीने एक निर्णय घेतला, आपल्या माणसाचे अस्तित्व कायम राखण्याचा. पशिने कुटुंबीयांचा संयम आणि मानवतावादाच्या भूमिकेमुळे त्यांनी पतीचे हृदय, यकृत, मूत्रपिंड, त्वचा व नेत्र दान केले. यामुळे चौघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे, गोंदिया येथील या मेंदू मृत व्यक्तीचे हृदय मुंबई येथे पाठविण्यात आले. चार तासांच्या अवधीत तेथील एका ३३ वर्षीय तरुणामध्ये हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपणही झाले. झनेश पशिने (४९) रा. रेलटोली, गोंदिया असे त्या मेंदू मृत अवयवदात्याचे नाव आहे.झनेश पशिने यांना २१ आॅगस्ट रोजी घरीच मेंदू पक्षाघाताचा झटका आला. त्यांना तातडीने गोंदिया येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. २२ आॅगस्ट रोजी त्यांना नागपुरातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे दीड दिवसांच्या उपचारानंतर व विविध तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी मेंदू मृत झाल्याची कल्पना पशिने कुटुंबीयांना दिली. पत्नी मनीषासह त्यांच्या दोन मुली व नातेवाईकांवर दु:खाचा बांध फुटला. सर्वच दु:खात असताना मनीषा यांनी स्वत:हून पुढाकार घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. या निर्णयाला दोन्ही मुलींनी संमती दिली. अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राचे सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. डॉ. वानखेडे यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती पशीने कुटुंबीयांना दिली.ाशीने यांचे हृदय मुंबई येथील ३३ वर्षीय युवकाला तर यकृत पुणे येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ६४ वर्षीय महिलेला देण्यात आले. याशिवाय एक मूत्रपिंड आॅरेंजसिटी हॉस्पिटलमधील ४० वर्षीय पुरुषाला तर दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलमधील ३० वर्षीय तरुणाला देण्यात आले. दोन्ही नेत्र माधव नेत्रपेढी यांना तर त्वचा आॅरेंजसिटी हॉस्पिटलच्या ‘स्किन बँके’मध्ये जमा करण्यात आले. चार गरजू रुग्णांचे जीवन वाचविल्याबद्दल आणि दोन दिव्यांगांना दृष्टी दिल्याबद्दल पशीने कुटुंबीयांचे कार्य प्रेरणादायी ठरल्या डॉक्टरांचा होता सहभागहृदय ‘रिट्रायवाल’ शस्त्रक्रिया मुंबईचे डॉ. अहमद शेख यांच्या नेतृत्वात डॉ. आनंद संचेती यांच्या मदतीने करण्यात आली तर यकृतावरील शस्त्रक्रिया पुण्याचे डॉ. प्रशांत राव यांच्या नेतृत्वात डॉ. राहुल सक्सेना यांनी मदत केली. याशिवाय डॉ. राजेश सोनी, डॉ. सुहास साल्पेकर, डॉ. संदीप देशमुख, डॉ. स्मिता हरकरे, डॉ. नीता देशपांडे, डॉ. अनिता पांडे, डॉ. स्वीटी पसारी, डॉ. समीर जहांगीरदार, डॉ. मुकुंद ठाकूर यांचेही सहकार्य मिळाले.

हृदय, यकृत प्रवासाची वेळ टळलीपुढील प्रक्रियेसाठी व अवयव जतन करण्यासाठी झनेश यांना खामला येथील आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये २३ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले. त्यानंतर आॅरेंजसिटीचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी तडक शासनाकडून नियुक्त प्रत्यारोपण आणि अवयव रिट्रायवाल युनिटशी संपर्क साधला. डॉ. वानखेडे आणि डॉ. शिवनारायण आचार्य यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केली. पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधण्यात आला. डॉ. मरार यांनी पोलिसांना आॅरेंजसिटी ते विमानतळ ग्रीन कॉरिडोरच्या आवश्यकतेबद्दल सांगितले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता विशेष विमानाने हृदय व यकृत मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलसाठी रवाना होणार होते. मात्र, मुंबईतील वातावरण ढगाळ असल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलने काही क्षण वाट पाहण्याचा सल्ला दिला. अखेर १.३० वाजताची वेळ ठरली. आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हृदय व यकृत काढण्यास सुरुवात झाली.३ मिनिट ५८ सेकंदात विमानतळ गाठलेहृदय प्रत्यारोपणासाठी चार तास तर यृकत प्रत्यारोपणासाठी सहा तासांचा अवधी असतो. हृदयासाठी लवकरात लवकर मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल तर यकृतसाठी पुणे येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल गाठणे आवश्यक होते. यासाठी गुरुवारी दुपारी २ वाजून १५ मिनिटाला आॅरेंजसिटी हॉस्पिटल ते विमानतळ हा मार्ग ‘ग्रीन कॉरिडोर’ करण्यात आला. वाहतूक शाखेचे उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी, प्रभारी सहायक पोलीस आयुक्त जयेश भांडारकर आणि त्यांच्या ४० पोलीस सहकाºयांच्या मदतीमुळे साधारण ५ किलोमीटरचे अंतर केवळ ३ मिनिट ५८ सेकंदात गाठता आले. यासाठी विमानतळाकडे जाणारा डावीकडचा रस्ता एका बाजूने पूर्णपणे मोकळा करण्यात आला होता. मुंबईनंतर हेच विशेष विमान पुण्यासाठी रवाना झाले.