आॅटोचालकाने परत केले सोन्याचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 03:07 IST2016-06-15T03:07:49+5:302016-06-15T03:07:49+5:30

वृद्ध दाम्पत्याचे लाखो रुपयांचे दागिने परत करीत एका आॅटोचालकाने प्रामाणिकपणाची प्रचिती दिली.

Gold jewelry returned by the autorickshaw | आॅटोचालकाने परत केले सोन्याचे दागिने

आॅटोचालकाने परत केले सोन्याचे दागिने

नागपूर : वृद्ध दाम्पत्याचे लाखो रुपयांचे दागिने परत करीत एका आॅटोचालकाने प्रामाणिकपणाची प्रचिती दिली. मंगळवारी दुपारी दत्तवाडी येथील रहिवासी अरुण किरवडकर पत्नी अंजलीसह इतवारी येथे खरेदीसाठी गेले होते. त्यांनी काही दागिन्यांची खरेदी केली. दागिने खरेदी करून एका आॅटोत ते परतले. आॅटोचालक हसनबाग येथील रहिवासी आॅटोचालक सादिक अब्दुल कादीर याने रोजा ठेवल्यामुळे इफ्तारचा वेळ होत असल्याने तो लगेच तेथून परतला. घरी पोहचल्यानंतर त्याला आॅटोत सुटलेल्या बॅगमध्ये ठेवलेल्या मोबाईलची रिंग वाजली. किरवडकर यांच्या जावयांनी त्याला बॅग विसरल्याचे सांगितले. आॅटोचालकाने लगेच बॅगेतील दागिने व ५० हजार रुपये रोख किरवडकर दाम्पत्याच्या सुपूर्द केले. (प्रतिनिधी)

Web Title: Gold jewelry returned by the autorickshaw