युद्धाचा इशाऱ्याने सोनं वधारणार; ५५ हजार रुपये तोळ्यावर जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 07:40 AM2022-01-21T07:40:00+5:302022-01-21T07:40:02+5:30

Nagpur News सध्या सोन्याच्या दरात वृद्धी होण्याची शक्यता ऑल इंडिया जेम्स ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काउंसिलचे संचालक व रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी व्यक्त केली आहे.

Gold hints at war; Possibility to weigh Rs 55,000 | युद्धाचा इशाऱ्याने सोनं वधारणार; ५५ हजार रुपये तोळ्यावर जाण्याची शक्यता

युद्धाचा इशाऱ्याने सोनं वधारणार; ५५ हजार रुपये तोळ्यावर जाण्याची शक्यता

googlenewsNext

आनंद शर्मा

नागपूर : सोने व चांदीचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारात हालचालींवर निर्भर असतात. जगात शांततेचे वातावरण असेल तर सोने व चांदीच्या दरात फारशी वाढ दिसून येत नाही; पण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सर्वांत मोठा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. सध्या सोन्याच्या दरात वृद्धी होण्याची शक्यता ऑल इंडिया जेम्स ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काउंसिलचे संचालक व रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात वृद्धी झाली आहे.

कारण रशिया लवकरच युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता अमेरिकेचे विदेशमंत्री एन्टनी ब्लिंगटन यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. यामुळे सोन्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचे परिणामही दिसायला लागले आहे. सोन्याचे दर ५० हजारांच्या जवळ पोहोचले आहेत. गुरुवारी १० ग्रॅम २४ कॅरेटच्या सोन्याचा भाव ४९२०० रुपये आहे. जीएसटीचा समावेश केल्यास सोन्याचा दर ५०६७६ रुपये आहे.

रोकडे यांचे म्हणणे आहे की, रशियाद्वारे युक्रेनवर हल्ला करण्याचा दिलेल्या इशाऱ्यामुळे भाव ५५ हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. लोक कमी किमतीत आता सोने खरेदी करू शकतात.

Web Title: Gold hints at war; Possibility to weigh Rs 55,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं