दसऱ्यानंतर उमेदवारांचे सोने वाटप
By Admin | Updated: October 9, 2016 02:17 IST2016-10-09T02:17:38+5:302016-10-09T02:17:38+5:30
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना शुक्रवारी जाहीर झाली आणि विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार अभ्यासाला लागले.

दसऱ्यानंतर उमेदवारांचे सोने वाटप
नगरसेवक, इच्छुक प्रभाग रचनेच्या अभ्यासात व्यस्त
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना शुक्रवारी जाहीर झाली आणि विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार अभ्यासाला लागले. आपल्याला अपेक्षित असलेला भाग नेमक्या कोणत्या प्रभागात गेला, कोणता प्रभाग अधिक सोयीस्कर राहील याची गणिते आखण्यात सर्वच व्यस्त आहे. खऱ्या अर्थाने दसऱ्याच्या निमित्ताने सोने (आपट्याची पाने) वाटप करून मतदारांचे आशीर्वाद घेण्यास इच्छुक सुरुवात करताना दिसतील. चार सदस्यीय प्रभाग असल्यामुळे प्रभागाचा आकार बराच मोठा झाला आहे. एवढ्या मोठ्या परिसरातून निवडणूक लढताना सर्वसामान्य उमेदवाराची दमछाक होणार आहे.
होर्डिंग्जच्या माध्यमातून दावेदारी
दसऱ्यानंतर उमेदवारांचे सोने वाटप
नागपूर : आता ते आरक्षण आले अन् गणित बिघडले, नाही तर आपली उमेदवारी पक्की होती, असे ठासून सांगत आहेत. गेल्या वेळी अपक्ष म्हणून लढलेले, प्रभागात सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले व यावेळी लढण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी पक्षांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. काही प्रभागात तर शुक्रवारी सीमांकन जाहीर होताच शनिवारी सकाळीच दुर्गोत्सव, दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देणारे इच्छुक उमेदवारांचे होर्डिंग्ज लागलेले दिसले.
काही उमेदवार अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत. नेमके कोणत्या प्रभागातून लढावे, याबाबत ते गोंधळलेले आहेत. काही नगरसेवक तर आपल्या प्रभागातील इतर जागेवर कोणता तगडा उमेदवार पक्षातर्फे दिला जावा याची गणिते आखण्यात व्यस्त आहेत. खऱ्या अर्थाने दसऱ्या नंतर इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराला वेग आलेला दिसेल. (प्रतिनिधी)
आचारसंहिता डिसेंबरमध्ये
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपकडे आता विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी अडीच महिने उरले आहेत. त्यामुळे पुढील काळात सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यासाठी भाजप पदाधिकारी सक्रिय झालेले दिसतील.