भगवंताचा १००८ कलशांनी अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:03+5:302021-01-13T04:18:03+5:30

- आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांचे मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इतवारी येथील श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन सेनगण मंदिराच्या ...

God's anointing with 1008 kalshas | भगवंताचा १००८ कलशांनी अभिषेक

भगवंताचा १००८ कलशांनी अभिषेक

- आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : इतवारी येथील श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन सेनगण मंदिराच्या सन्मती भवनात शनिवारी भगवान चंद्रप्रभू आणि भगवान पार्श्वनाथ यांचा जन्मोत्सव तप कल्याणक साजरा झाला. आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात हा पूजाविधी पार पडला.

याप्रसंगी आचार्यश्री यांचे मार्गदर्शन झाले. तीर्थंकराचा जेव्हा जन्म होतो, तेव्हा तिन्ही लोकांत क्षणभर शांतता प्रस्थापित होत असते. तीर्थंकर हे सर्वश्रेष्ठ आहेत. तीर्थंकर पूर्व पुण्यकर्माने गर्भ, जन्म कल्याणकाचे सुख भाेगत असतात आणि पुढे तप कल्याणकात तप तरून केवलज्ञानाची प्राप्ती घेत असतात.

सकाळी ७ वाजता भगवंतांचा १००८ कलशांनी अभिषेक सौधर्म इंद्र राजकुमार खेडकर, सची इंद्राणी, स्नेहा खेडकर, दुसरे सौधर्म इंद्र सुनील पेंढारी, सची इंद्राणी, नीता पेंढारी आणि शांतिधारा ऋषभ संतोष पेंढारी, ॲड. मनीष राजेंद्र जोहरापूरकर यांनी केले. पन्नाला खेडकर, सतीश पेंढारी, सुरज पेंढारी, हिराचंद मिश्रीकोटकर, दीपक दर्यापूरकर, मिलिंद जोहरापूरकर, नरेंद्र तुपकर, मंजू जोहरापूरकर, सरोज मिश्रिकोटकर, प्रमिला देवलसी, नंदा जोहरापूरकर, वीणा डोणगांवकर, दिनकरराव जोहरापूरकर, द्विपेंद्र जोहरापूरकर, राजकुमार जेजानी, नलिनी लाड, सुशीला जोहरापूरकर, स्नेहा खेडकर, स्नूषा खेडकर, विपुल खेडकर, प्रीती पेंढारी, विलास आग्रेकर, हुकुमचंद चवरे, गजकुमार चवरे, प्रज्ञेश महाजन यांनीही अभिषेक केला.

भक्तांनी केले पंचकल्याणक विधान

दुपारी १ वाजतापासून संध्याकाळी ५.३० वाजतापर्यंत २४ तीर्थंकरांचा पंचकल्याणक विधान आचार्यश्री यांच्या सान्निध्यात झाले. पूजा पंकज खेडकर, विराज खेडकर, परिमल खेडकर, सुनील आगरकर, राजेंद्र सोनटक्के यांनी केली. दरम्यान, सेवेसाठी पंकज खेडकर, विराज खेडकर, राजेंद्र सोनटक्के, महावीर जैन, आदिनाथ जैन, प्रज्ञेश महाजन यांचे स्वागत करण्यात आले.

आजचे कार्यक्रम

सन्मती भवनात रविवारी १० जानेवारीला आचार्यश्री यांचे विशेष प्रवचन होईल. १५ जानेवारीला सम्मेदशिखरजी यांच्याकडून आचार्यश्रींचा विहार होण्याची शक्यता आहे.

Web Title: God's anointing with 1008 kalshas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.