सावनेर पंचायत समितीचा गौरव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:12 IST2021-08-19T04:12:03+5:302021-08-19T04:12:03+5:30

सावनेर : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सावनेर पंचायतीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्य ...

The glory of Savner Panchayat Samiti increased | सावनेर पंचायत समितीचा गौरव वाढला

सावनेर पंचायत समितीचा गौरव वाढला

सावनेर : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सावनेर पंचायतीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वातंत्र्य दिनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गट विकास अधिकारी अनिल नागणे आणि सहायक गट विकास अधिकारी दीपक गरुड यांना प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन राऊत यांनी गौरवान्वित केले. पंचायत समिती अंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टरचा पुरस्कार बडेगाव ग्रामपंचायत अंतर्गतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहायक आरोग्य अधिकारी संजय सावरकर यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतचा तिसरा क्रमांक खापा नरसाळा ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद चाफेकर आणि ग्रामसेवक किरण वैष्णव मिळाला. सर्वोत्कृष्ट क्लस्टर द्वितीय पुरस्कार वाकोडी ग्रामपंचायतचे अभियंता अभिजित सोनटक्के यांनी मिळविला. सर्वोकृष्ट ग्रामपंचायतच द्वितीय

पुरस्कार रायवाडी ग्रामपंचायतचे सरपंच प्रल्हाद गोहणे आणि ग्रामसेवक संजय घोळसे यांनी मिळविला.

180821\img-20210815-wa0399.jpg

सावनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे व सहाय्यक गट विकास अधिकारी दीपक गरुड पालक मंत्री नितीन राऊत यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे

Web Title: The glory of Savner Panchayat Samiti increased