लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात नागपूर-बुटीबोरीदरम्यान ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ स्किल अँड लॉजिस्टिक्स तयार करण्याचा नितीन गडकरी यांनी दिलेला प्रस्ताव महत्त्वाचा आहे. यासाठी १०० एकर जमीन आणि इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या तीन दिवसीय अॅडव्हांटेज विदर्भ २०२५ खासदार औद्योगिक महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. याप्रसंगी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, आ. चित्रा वाघ, आ. राजेश वानखेडे, माजी खासदार अजय संचेती, उद्योग सचिव पी. अनबलगन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मनोज सूर्यवंशी, आयआयएम संचालक डॉ. भीमराया मेत्री, प्र कुलगुरू राजेंद्र काकडे, आ. चैनसुख संचेती, इप्काचे सीएमडी प्रेमचंद गोधा, अनुप अग्रवाल, भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे, डॉ. विकास महात्मे, आ. चरणसिंग ठाकूर आणि सुनील मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भाचा समग्र विकास हा उद्देश असून, यासाठी नागपूर आणि अमरावती है मॅग्नेट क्षेत्र तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आहेत. यामुळे आसपासच्या जिल्ह्यांचाही विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपुरात
विदर्भ महाराष्ट्राच्या प्रगतीचे इंजिन : पीयूष गोयलभारताने औद्योगिक क्रांती ४.० ही संधी गमावून चालणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले असून, औद्योगिक क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात देशात १०० प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्र तयार करण्याचा निर्णय झालाय. महाराष्ट्र आघाडीवर असेल.
साडेसात लाख कोटींची गुंतवणूक : नितीन गडकरी
- खासदार औद्योगिक महोत्सवातून विविध प्रकल्पांमधून साडेसातलाख कोटींची गुंतवणूक विदर्भात होत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
- याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात 3 जगातील सर्वोत्तम दर्जाचे लोहखनिज असून, यामुळे नजीकच्या जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरू होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
- नागपूरच्या एमआरओमध्ये बोईंगचे काम सुरू असून, नागपूर एव्हिएशन हब होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
- भारतातले सर्वात मोठे लॉजिस्टिक हब नागपूर आणि वर्ध्याच्या मध्ये निर्माण होत आहे, यामुळे जगात कुठेही आणि कितीही निर्यात नागपुरातून होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.