‘ग्लोबल नागपूर समीट’ २१ पासून

By Admin | Updated: November 19, 2015 03:29 IST2015-11-19T03:29:44+5:302015-11-19T03:29:44+5:30

वर्ष २०२० पर्यंत नागपूरला जागतिक शहर बनविण्याच्या उद्देशांतर्गत ‘नागपूर फर्स्ट’ संस्थेच्या वतीने २१ आणि २२ नोव्हेंबरला ‘ग्लोबल नागपूर समीट-२०१५’...

'Global Nagpur Summit' from 21 | ‘ग्लोबल नागपूर समीट’ २१ पासून

‘ग्लोबल नागपूर समीट’ २१ पासून


‘नागपूर फर्स्ट’ संस्थेचे आयोजन : लोकमत मीडिया पार्टनर
नागपूर : वर्ष २०२० पर्यंत नागपूरला जागतिक शहर बनविण्याच्या उद्देशांतर्गत ‘नागपूर फर्स्ट’ संस्थेच्या वतीने २१ आणि २२ नोव्हेंबरला ‘ग्लोबल नागपूर समीट-२०१५’ (जीएनएस) चे आयोजन पर्सिस्टंट सिस्टिम्स आयटी पार्कच्या सभागृहात करण्यात येणार आहे. लोकमत मीडिया पार्टनर आहे.
मान्यवरांची उपस्थिती
नागपूर फर्स्टचे अध्यक्ष दिनेश जैन यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, ‘जीएनएस’च्या पहिल्या दिवशी २० प्रमुख वक्ते नागपूरला स्मार्ट सिटी बनविणे, शहराच्या विकासात आंतरराष्ट्रीय सहयोग आणि जागतिक स्तरावर नागपूरच्या विकासाच्या मुद्यांवर मार्गदर्शन करतील. प्रमुख वक्त्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, सिस्टर सिटीज इंटरनॅशनलचे चेअरमन बिल बोएरम, फाऊंडेशन फॉर फ्युचरिस्टिकचे संस्थापक अध्यक्ष करुणा गोपाल, ब्रिटिश दूतावासाचे (मुंबई) उपउच्चायुक्त कुमार अय्यर, मुंबईतील आॅस्ट्रेलियन दूतवासाचे मार्क पियर्स, इंडो-कॅनडा इम्पॅक्ट सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नेमी बांठिया, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा समावेश आहे.

उद्योजकांना पुरस्कार देणार
नागपूर फर्स्ट अवॉर्ड समितीेचे अध्यक्ष हेमंत लोढा यांनी सांगितले की, २१ नोव्हेंबरला सायंकाळी १४ वर्गवारीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागपूर आणि जागतिकस्तरावरील उद्योजकांना पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रम रॅडिसन ब्ल्यू हॉटेल, वर्धा रोड येथे होणार आहे. पुरस्कारासाठी ८० नावे आली आहेत. स्थानिक आणि जागतिकस्तरावरील उद्योजकांना प्रोत्साहित करून नागपूरला ग्लोबल सिटीमध्ये सहभागी करून देण्याचा उद्देश आहे.

विविध विषयांवर चर्चासत्र
नागपूर : २२ नोव्हेंबरला रिटेल सप्लाई चेन, लॉजिस्टिक्स, डिफेन्स, एअरोस्पेस, हेल्थकेअर, वैद्यकीय पर्यटन या विषयांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डिक्की स्कील अ‍ॅण्ड ईडीपी सेक्टर कौन्सिलचे अध्यक्ष अरुण खोब्रागडे, क्राऊडएराचे संस्थापक चेत जैन, निको डिफेन्स सिस्टिम्सचे संचालक डी.पी. सरमा, इंडिया साऊथ अफ्रिका अ‍ॅण्ड मध्यपूर्व, केल्डेरिसचे व्यवस्थापकीय संचालक हकीमुद्दीन अली, यूकेच्या न्यू क्रॉस हॉस्पिटलचे सल्लागार कार्डिओलॉजिस्ट व इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट डॉ. संजीव पेटकर, केपीएमजी इंडियाचे पार्टनर व नॅशनल हेड उत्कर्ष पालनिटकर, यूकेचे सल्लागार शोल्डर डॉ. विशाल साहनी, स्वीडन दूतावासाचे फ्रेड्रिका ओर्नब्रेन्ट, ब्रिटिश दूतवास वेस्ट इंडियाचे संचालक शेरॉन मेमीस, पेप्सीकोचे उपाध्यक्ष सत्यव्रत पेंढारकर आदी वक्ते मार्गदर्शन करतील.
पत्रपरिषदेत ‘नागपूर फर्स्ट’चे सचिव फैज वाहिद, सदस्य हकीमुद्दीन अली, संजय अरोरा, रेडीसन ब्लू हॉटेलचे महाव्यवस्थापक मनोज बाली, एन्सारा मेट्रो पार्कच्या महाव्यवस्थापक वंदना रघुवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Global Nagpur Summit' from 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.