निराधारांना ५४०० रुपये महिना द्या

By Admin | Updated: December 17, 2015 03:30 IST2015-12-17T03:30:28+5:302015-12-17T03:30:28+5:30

१९९४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सामाजिक सुरक्षा समान पेन्शन योजना सुरू करून श्रावणबाळ,

Give Rs. 5400 per month to the dependents | निराधारांना ५४०० रुपये महिना द्या

निराधारांना ५४०० रुपये महिना द्या

नागपूर : १९९४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सामाजिक सुरक्षा समान पेन्शन योजना सुरू करून श्रावणबाळ, विधवा महिला, अपंग, निराधार यांना वाढत्या महागाईनुसार ५४०० रुपये महिना द्यावा आणि इतर मागण्यांसाठी आंबेडकरवादी संघर्ष पार्टीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी मॉरिज कॉलेज टी पॉईंट येथे हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात सहभागी नागरिकांनी जोरदार नारेबाजी करून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले.
नेतृत्व
आय. एल. नंदागवळी
मागण्या
निराधारांना ५४०० रुपये महिना द्यावा
निराधारांचे चालू असलेले पगार बंद न करता सुरू ठेवावे
विधवा महिलांचे मुल २५ वर्षाचे आणि अपंगाचे वय २५ वर्षाचे झाल्यानंतर पगार बंद करू नये
६० वर्षानंतर शेतकरी, शेतमजुर, कामगारांना कोणतीही अट न लावता ५४०० रुपये महिना द्यावा
घरकुलासाठी ३ लाख रुपयाचा निधी मंजूर करावा

Web Title: Give Rs. 5400 per month to the dependents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.