शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा न्यायालयातील लिफ्टस्ना पॉवर बॅकअप द्या : हायकोर्टात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 21:58 IST

जिल्हा न्यायालयामध्ये लिफ्टस्ना पॉवर बॅकअपसह विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी महासचिव मनोज साबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष गुरुवारी सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देडॉक्टर, रुग्णवाहिका इत्यादी मागण्याही केल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा न्यायालयामध्ये लिफ्टस्ना पॉवर बॅकअपसह विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी महासचिव मनोज साबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष गुरुवारी सुनावणी होणार आहे.मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जिल्हा न्यायालयातील लिफ्टस् बंद पडल्या होत्या. एका लिफ्टमध्ये अडकलेल्या शाहीन शहा, आफरीन अझमत व सुधा सहारे या तीन महिला वकील बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांची प्रकृती अत्यंत खराब झाली होती. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे त्या बचावल्या. भविष्यात पुन्हा अशा अकस्मात घटना घडू नये व घडल्यास आवश्यक सुविधा उपलब्ध राहाव्या याकरिता हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयातील लिफ्टस्ना पॉवर बॅकअप देण्यात यावे, वैद्यकीय केंद्र स्थापन करून त्या ठिकाणी डॉक्टर व सहयोगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, वैद्यकीय केंद्राला रुग्णवाहिका, स्ट्रेचर व व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात याव्यात, आवश्यक ठिकाणी अग्निशमन यंत्रे बसविण्यात यावीत व जिल्हा न्यायालयासाठी स्वतंत्र अग्निशमन पथक नेमण्यात यावे अशा साबळे यांच्या मागण्या असून यासंदर्भात सरकारला आदेश देण्याची विनंती या अर्जाद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे.पार्किंग ठरतो अडथळासध्या जिल्हा न्यायालयात पार्किंगकरिता अपुरी जागा आहे. त्यामुळे शक्य तेथे वाहने उभी ठेवली जातात. परिणामी, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन आत आणता येत नाही. याच कारणाने मंगळवारी महिला वकिलांना उचलून बाहेर न्यावे लागले. ही बाब लक्षात घेता पक्षकार व आगंतुकांना न्यायालय परिसरात वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात यावी असेही साबळे यांचे म्हणणे आहे. जिल्हा न्यायालयातील पार्किंगवर उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती. तसेच, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन आत आणता येईल एवढी जागा मोकळी ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर काही दिवस जागा मोकळी ठेवण्यात आली. आता परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.दोन व्हीलचेअर्स भेट 

मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी मंगळवारची घटना गंभीरतेने घेऊन जिल्हा न्यायालयाला स्वत:तर्फे दोन व्हीलचेअर्स भेट दिल्या. याप्रसंगी जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा, सचिव अ‍ॅड. नितीन देशमुख, अ‍ॅड. पारिजात पांडे, अ‍ॅड. दीपक कोल्हे, अ‍ॅड. जयंत अलोणी, अ‍ॅड. अभय जिकार, अ‍ॅड. वर्षा आगलावे, अ‍ॅड. माधुरी मोटघरे, अ‍ॅड. विजय पेटकर, अ‍ॅड. अनिल गुल्हाने, अ‍ॅड. परिक्षित मोहिते, अ‍ॅड. अमित चन्ने, अ‍ॅड. रुबी सिंग, अ‍ॅड. शबाना खान, अ‍ॅड. बाबा भांडेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिलCourtन्यायालय