नागपूरच्या नागनदी विकासाचा सप्टेंबरपर्यंत आराखडा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 22:41 IST2018-06-12T22:41:45+5:302018-06-12T22:41:59+5:30
नागनदी विकास प्रकल्पात समावेश असलेले नदी काठावरील सौंदर्यीकरण, पाण्याचे शुद्धीकरण व जमीन अधिग्रहण याबाबतचा प्राथमिक आराखडा सप्टेबर २०१८ पर्यंत महापालिकेला सादर करण्याची सूचना आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केली. ‘नाग रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट’ प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या नाग नदी विकास आराखड्यासंदर्भात मंगळवारी महापालिका मुख्यालयात फ्रान्स येथील एजन्सी आॅफ फ्रेन्च डेव्हलपमेंट (एएफडी)च्या प्रतिनिधींसोबत महापालिकेच्या एनएसईएल आणि नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कापोर्रेशनच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यात नाग नदी विकासाच्या प्रस्तावित विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली.

नागपूरच्या नागनदी विकासाचा सप्टेंबरपर्यंत आराखडा द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागनदी विकास प्रकल्पात समावेश असलेले नदी काठावरील सौंदर्यीकरण, पाण्याचे शुद्धीकरण व जमीन अधिग्रहण याबाबतचा प्राथमिक आराखडा सप्टेबर २०१८ पर्यंत महापालिकेला सादर करण्याची सूचना आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केली. ‘नाग रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट’ प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या नाग नदी विकास आराखड्यासंदर्भात मंगळवारी महापालिका मुख्यालयात फ्रान्स येथील एजन्सी आॅफ फ्रेन्च डेव्हलपमेंट (एएफडी)च्या प्रतिनिधींसोबत महापालिकेच्या एनएसईएल आणि नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कापोर्रेशनच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. यात नाग नदी विकासाच्या प्रस्तावित विकास आराखड्यावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला आयुक्तासह नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, एनईएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिजवान सिद्दिकी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक वनसंरक्षक व्ही.एस. उमाळे, एएफडीचे नगर विकास प्रकल्प अधिकारी एंटोनी बेज, क्लेमन्स, विडाल डी ले ब्लिलकॅच , गौतियन कोहलर, पॅरिस येथील सिग्नेस कंपनीच्या वास्तुविशारद सिबिला जॅक्सिक, पी.के. दास अॅन्ड असोसिएटस् मुंबई येथील वास्तुविशारद समर्थ दास, एनएसएससीडीसीएलचे महाव्यवस्थापक उदय घिये, महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, मुख्य अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.
यावेळी सिग्नेस कंपनीच्या आर्किटेक्ट सिबिला जॅक्सिक आणि पी.के. दास अॅण्ड असोशिएटस्चे समर्थ दास यांनी नाग नदीच्या विकास आराखड्याचे सादरीकरण केले. नाग नदीच्या तीरावरील सौंदर्यीकरण, त्यासाठी असलेली जमिनीची आवश्यकता, पाण्याची शुद्धीकरण आदीबाबत त्यांनी माहिती दिली. नाग नदीचे उगमस्थान अंबाझरी ओव्हलफ्लो पासून प्रजापती नगर पारडीपर्यंतच्या नाग नदीच्या तीरावर काय-काय केले जाऊ शकते, याबाबत माहिती दिली.
एएफडीने यावेळी नाग नदी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत पुढील वर्षभरात राबविण्यात येणाºया उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपअभियंता (नद्या व सरोवरे) मो. इसराईल, उपअभियंता राजेश दुफारे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर उपस्थित होते.