शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेंच धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:41 IST

पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी किसान बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

ठळक मुद्देकिसान बचाव कृती समिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच धरणातून नागपूर शहराला पाणीपुरवठा होतो. पण शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होत नाही. महापालिका प्रशासनाने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी व पेंच धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनाकरिता व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी घेऊन नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी किसान बचाव कृती समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.तुळशीराम कोठेकर, रामू खंडाईत, धनराज वलोकर, मुरली खंडाळा यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चामध्ये जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, अमोल देशमुख, सदानंद निमकर, राम नेवले, अरुण केदार, माजी सभापती टेकचंद सावरकर आदी सहभागी झाले होते. मोर्चाच्या पूर्वी शेतकऱ्यांनी संविधान चौकात धरणे दिले. त्यानंतर संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला. समितीतर्फे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये चौराई धरणासंदर्भात महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारमध्ये झालेल्या करारानुसार पाणी देण्यात यावे. मौजा लोहघोगरी, कन्हान नदी ते तोतलाडोह धरण अंडरग्राऊंड टनेलरूपाने कॅनाल प्रकल्पास वन व इतर सर्व आवश्यक प्रस्तावास मंजुरी देऊन जलद गतीने प्रकल्प पूर्ण करावे. नागपूर शहराची पाणीपुरवठ्याची स्वतंत्र सोय महापालिकेने करावी. कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन मंजूर करून, अटी शर्थी शिथिल कराव्यात. सिंचन व्यवस्थापन न झाल्यास महाराष्ट्र शासन जलसिंचन विभागाकडून प्रति हेक्टरी २५ हजार अनुदान साहाय्य मंजूर करावे. कन्हान नदीतून बिड, चिचघाट, सिहोरा, बाबदेव, मौदा, उपसा सिंचन प्रकल्प २०१९ च्या खरीप पीकाकरिता पूर्ण करण्यात यावे. शेतीपयोगी रासायनिक खते, कीटकनाशके माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या यावेळी मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या. मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMorchaमोर्चाWaterपाणी