परधान जमातीला आदिम जमातीचा दर्जा द्या

By Admin | Updated: December 16, 2015 03:31 IST2015-12-16T03:31:56+5:302015-12-16T03:31:56+5:30

परधान जमात ही गोंडियन संस्कृतीची प्रचारक व निर्मिती असून परधान जमातीला आदिम जमातीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी ...

Give Parsharan Jamatim the status of primitive tribes | परधान जमातीला आदिम जमातीचा दर्जा द्या

परधान जमातीला आदिम जमातीचा दर्जा द्या

अखिल भारतीय परधान समाज कृती समिती
नागपूर : परधान जमात ही गोंडियन संस्कृतीची प्रचारक व निर्मिती असून परधान जमातीला आदिम जमातीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय परधान समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य चंद्रपूर जिल्हा शाखेच्यावतीने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पोलिसांनी मॉरिस कॉलेज येथे हा मोर्चा अडविला. मोर्चात सहभागी परधान जमातीच्या बांधवांनी जोरदार नारेबाजी करून शासन दरबारी आपल्या मागण्या रेटून धरल्या.
नेतृत्व : एकनाथ कन्नाके, के. पी. प्रधान
मागण्या :
परधान जमातीला ९ सप्टेबर २०१५ च्या मानवशास्त्रीय अभ्यास योजनेतून वगळण्यात यावे
परधान जमात ही गोंडियन संस्कृतीची प्रचारक व निर्मिती आहे, त्यामुळे परधान जमातीला आदिम जमातीचा दर्जा द्यावा
आदिवासी परधान जमातीच्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी बार्टी योजनासारख्या योजना निर्माण करून प्रशिक्षण द्यावे
बोगस आदिवासींना संरक्षण देणारा २१ आॅक्टोबर २०१५ चा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा
राज्य घटनेच्या ३४२ अनुच्छेदात नमूद आदिवासी जमात ठरविण्याच्या प्रक्रियेत घटनाबाह्यरीत्या नव्याने बदल करण्यात येऊ नये
परधान जमातीवर षड्यंत्र करणारे आयुक्त संभाजी सरकुंडे यांची कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी

Web Title: Give Parsharan Jamatim the status of primitive tribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.